बॉलिवूडचा चॉकलेट बॉय म्हणून ओळखला जाणारा ‘कार्तिक आर्यन’ आता पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
कार्तिक आर्यनचा एक व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत कार्तिक आर्यनच्या चाहत्यांनी त्याच्या गाडीभोवती गर्दी केल्याचे दिसत असून चाहत्यांच्या गर्दीत कार्तिकची गाडी अडकल्याचे दिसत आहे. कार्तिक आर्यन चा ‘लव्ह आज कल’ हा चित्रपट प्रदर्शित होण्या आधीच चर्चेत आहे.
याकरीता कार्तिक चढला गाडीवर
कार्तिक आर्यन हा त्याच्या चाहत्यांमुळे कायमच चर्चेत असतो. याच कारणाने कार्तिक पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सोशल मिडीयावर व्हायरल झालेला व्हिडिओत कार्तिक गर्दीला सावरण्यासाठी गाडीवर चढलेला दिसतो आहे. कार्तिकच्या चाहत्यांनी त्याला भेटण्यासाठी त्याच्या गाडीभोवती गर्दी केलेली ती सावरणे अवघड झाले त्यामुळे कार्तिक स्वत: गाडीवर चढला. गर्दीमुळे गाडीपुढे घेऊन जाणे अश्यक्य होते अश्यावेळी चाहत्यांना दिलासा देऊन गर्दी सावरण्याकरीता कार्तिक गाडीच्या बोनेटवर चढल्याचे दिसते आहे. अशी घटना घडण्याची ही पहिलीच वेळ नसून या आधी देखील त्याच्या एका चाहतीने त्याला घराच्या बाहेर प्रपोज करून लग्नाची मागणी घातलेली.
कार्तिक आर्यनचा आगामी चित्रपट ‘लव आज कल’ हा चित्रपट प्रदर्शित होण्या आधीच चर्चेत आहे. ‘लव आज कल’ या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यावर या चित्रपटात प्रमुख भुमिकेत असणारी सारा अली खान चे वडील अभिनेते ‘सैफ अली खान’ यांनीच या ट्रेलर विषयी नाराजी व्यक्त केलेली. तरी येणाऱ्या काळात कार्तिक आर्यनचे भूल भुलैया २, दोस्ताना २ हे चित्रपट देखील प्रदर्शित होणार आहेत. त्यामुळे येणाऱ्या आगामी काळात हे चित्रपट चाहत्यांच्या पसंतीस पडतात का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.