Saturday, August 8, 2020
Mumbai
29.1 C
घर ट्रेंडिंग पोलीस कॉन्स्टेबलचं ‘हे’ गाणं ऐकून कार्तिक आर्यन म्हणतो…!

पोलीस कॉन्स्टेबलचं ‘हे’ गाणं ऐकून कार्तिक आर्यन म्हणतो…!

रॉकस्टार पोलीस म्हणून या अभिनेत्याने रजतचे कौतुक केले आहे.

mumbai
पोलीस कॉन्स्टेबलचं 'हे' गाणं ऐकून कार्तिक आर्यन म्हणतो...!

सध्या दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल रताज राठोड यांच्या गाण्याची सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे. काही दिवसांपुर्वी त्यांनी ‘तेरी मिट्टी’ हे गाणं गायलं होतं त्याचा व्हिडिओदेखील जोरदार व्हायरल झाला होता. तो व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अक्षय कुमारने ट्विट करुन रजत यांच्या आवाजाचे कौतुक देखील केले होते. आता रजतने ‘तेरा यार हूं मैं’ हे गाणं गायलं आहे, जे गाणं बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनला खूपच आवडले. रॉकस्टार पोलीस म्हणून या अभिनेत्याने रजतचे कौतुक केले आहे.

 

कार्तिक आर्यनने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर रजत यांचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ते पोलिसांच्या गणवेशात ‘तेरा यार हूं मैं’ हे गाणे गाताना दिसत आहे. कार्तिकने कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “रॉकस्टार पोलीस”. तुम्ही प्रत्येक वेळी मनं जिंकता. “अभिनेत्याच्या या पोस्टवर, युजर्ल प्रतिक्रिया देत आहेत.

View this post on Instagram

Bulaati hai magar jaane ka nahi ?

A post shared by KARTIK AARYAN (@kartikaaryan) on

चाहतीला दिल्या शुभेच्छा…

अलीकडेच, कार्तिकने त्याच्या वाढदिवशी त्यांच्या चाहत्यांपैकी एकाला शुभेच्छा दिल्या. त्याची स्टाईल युजर्सनी खूप पसंत केली. फॅनने ट्विट केले की, आज माझा वाढदिवस आहे. कृपया कार्तिक आर्यनला हा मॅसेज पाठवा. कार्तिक मला आशा आहे की, तू माझा मॅसेज बघशील आणि मला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणार…

जर कार्तिक आर्यनने मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या तर माझा वाढदिवस खूप खास ठरेल. मी आशा करते की तू माझा मॅसेज बघशील आणि नक्की शुभेच्छा देशील. तुझी चाहती…. कार्तिकने या मॅसेज उत्तर म्हणून फॅनला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात. त्याने लिहिले, ‘रुचिका वाढदिवसाच्या शुभेच्छा. आपला दिवस चांगला जावो सुरक्षित रहा…


भारताचा एकमेव मराठी ओटीटी प्लॅटफॉर्म; अभिनेता पुष्कर श्रोत्री यांचा उपक्रम