फोटोतील दोन पोनीतला मुलगा आहे बॉलिवूडचा चॉकलेट बॉय

Mumbai
kartik aaryan with his mother cute childhood photo viral on internet
फोटोतील दोन पोनीतला मुलगा आहे बॉलिवूडचा चॉकलेट बॉय

सोशल मीडियावर बॉलिवूड कलाकरांचे बालपणीचे फोटो फारच व्हायरल होत असतात. काही वेळापूर्वी एका बॉलिवूडच्या चॉकलेट बॉयने त्याच्या बालपणीचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला. या फोटोमधली कलाकाराला ओळखणं फार कठीण आहे. सध्या मुलींचा क्रश असलेला बॉलिवूडचा चॉकलेट बॉय कार्तिक आर्यन याचा हा बालपणीचा फोटो आहे. कार्तिकने हा बालपणीचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. सोशल मीडियावर या फोटोने धुमाकूळ घातला आहे.

कार्तिकने आईच्या वाढदिवसानिमित्ताने आईसोबतचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करताना त्याने असं लिहिलं की, ‘माझ्या आवडत्या हेअरस्टायलिस्टला वाढदिवसाच्या शुभेच्छा. लव यू मम्मी.’ या फोटोमध्ये कार्तिक फारच गोंडस दिसत आहे. कार्तिकचे चाहते या फोटोवर खूप प्रतिक्रिया देत आहेत.

View this post on Instagram

Looking at you Swipe Right 👀

A post shared by KARTIK AARYAN (@kartikaaryan) on

काही दिवसांपूर्वी कार्तिक आर्यन ‘पती पत्नी और वो’ या चित्रपटात दिसला होता. या चित्रपटात अभिनेत्री भूमी पेडणेकर आणि अन्यया पांडे प्रमुख भूमिकेत दिसल्या होत्या. कार्तिक आर्यनच्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. लवकरच कार्तिक सारा अली खानसोबत ‘लव आज कल’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.


हेही वाचा – ‘लव आज कल’ या चित्रपटाचा पोस्टर रिलीज


 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here