Monday, January 11, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन सलमान खानचा एक सल्ला आणि कश्मीराला झालं जुळं

सलमान खानचा एक सल्ला आणि कश्मीराला झालं जुळं

कश्मीरा तब्बल १४ वेळा आई होण्याचा प्रयत्न केला मात्र प्रत्येक वेळी अयशस्वी ठरत होती.

Related Story

- Advertisement -

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री कश्मीरा शाह हिच्या अनेक चर्चा सतत होत असतात. सिनेमा ते टेलिव्हिजन अभिनेत्री म्हणून तिला सगळेच ओळखतात. कश्मीरा शाह बिग बॉसमध्येही दिसली होती. तिथेही तिने चांगले काम केले पण तिला फार कमी वेळेत या शोमधून बाहेर पडावं लागले. सध्या कश्मीरा तिच्या बोल्ड फोटो शूटमुळेही खूप चर्चेत आली. तिचा नवरा अभिनेता कृष्णा अभिषेकने त्याच्या सोशल मीडियावर तिचे फोटो शेअर करत तिचे कौतुक केले होते. कश्मीरा आणि कृष्णा यांची लव्ह स्टोरीही चांगलीच चर्चेत आली होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kashmera Shah (@kashmera1)

- Advertisement -

कश्मीरा आणि कृष्णा यांच्या प्रेमाची सुरूवात पप्पू पास हो गया या सिनेमाच्या सेट झाली होती. शूटींग संपल्यावर दोघे एकमेकांसोबत वेळ घालवत होते. त्यानंतर ते एकमेकांच्या प्रेमात पडले. काही दिवस ते लिव्ह इन रिलेशनशीपमध्येही राहत होते. २०१३ मध्ये दोघेही विवाहबंधनात अडकले. दोघांनाही लहान मुलांची खूप आवड आहे. कश्मीरा आई होण्यासाठी खूप प्रयत्न करत होती. कश्मीरा तब्बल १४ वेळा आई होण्याचा प्रयत्न केला मात्र प्रत्येक वेळी अयशस्वी ठरत होती. तिचा पती कृष्णा आणि ती अनेक टेस्ट आणि डॉक्टरांचे सल्ले घेत होते. मात्र दोघांनाही आई वडिल बनता येत नव्हते. भाईजान सलमान खानची कश्मीरला खूप मोठी मदत झाली. कश्मीरा आणि कृष्णाने ही गोष्ट सलमान खानला सांगितली. सलमान खानच्या एका सल्ल्यामुळे कश्मीरा आणि कृष्णा आई वडिल होऊ शकले. आज त्यांना दोन जुळी मुले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kashmera Shah (@kashmera1)

- Advertisement -

एका मुलाखतीत कश्मीरा सांगितले की, आमचे लग्न होऊन खूप दिवस झाले होते. आम्ही बाळासाठी विचार करत होतो. १४ वेळा प्रयत्न करूनही मी आई होऊ शकले नाही. मी खूप डिप्रेस झाले होते. कृष्णा आणि मी आयव्हिएफ टेक्नलॉजीचाही मदत घेतली. मात्र त्याचाही काही उपयोग झाला नाही. आम्हाला अपयशच येत होते. सलमान खानला आम्ही ही गोष्ट सांगितली तेव्हा त्याने आम्हाला सरोगसी करण्याचा सल्ला दिला. आम्ही या सल्ल्याचा योग्य विचार केला. आम्हाला तो विचार पटला. २०१७मध्ये आम्हाला जुळी मुले झाली. सलमान खानने आमच्यासाठी जे काही केले त्यासाठी आम्ही त्याचे आयुष्यभर ऋणी आहोत, असे कश्मीरा सांगतले.


हेही वाचा – Rowan Atkinsonने मिस्टर बीनला केले अलविदा

- Advertisement -