Corona: IPL नंतर चित्रपटांचे शुटिंगही दुबईत! कतरिना कैफचं शूट होणार अबुधाबीत

भारतात लॉकडाऊन आणि कोरोनाचं असलेलं सावट लक्षात घेऊन आता दुबईत चित्रकरणं होऊ लागली आहेत.

जगभरासह देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढता असल्याने बहुचर्चित आयपीएल सामने देखील आबुधाबी, दुबईत पार पडताय. मात्र कोरोनाचा कहर कमी होत नसल्याने क्रिकेटसह आता चित्रपटाची शुटिंग्जही दुबईला होताना दिसू लागली आहेत. आबुधाबी आणि दुबईमध्ये होणाऱ्या आयपीएल सामन्यांमुळे सर्वत्र एकच चर्चा सुरू आहे. यंदा कोरोनाचं सावट असल्याने आयपीएल सामने दुबईत असतील असा निर्णय झाला. मात्र यानंतर चित्रपटांचे शुटिंगही भारताबाहेर होत आहेत. दुबई आणि अबुधाबीचे कलाकारांशी असलेलं कनेक्शन जगजाहीर आहेच. भारतात लॉकडाऊन आणि कोरोनाचं असलेलं सावट लक्षात घेऊन आता दुबईत चित्रकरणं होऊ लागली आहेत.

दरम्यान बॉलिवूड अभिनेत्री कतरिना या लॉकडाऊनच्या काळात बऱ्याच दिवसांनी चर्चेत आली आहे. तिचा आगामी सुपरवुमन या कन्सेप्टवर आधारलेला चित्रपट आता तयार होतो आहे. अली अब्बास जफर हे या सिनेमाचे दिग्दर्शक असून त्यांच्यासोबत चित्रपटाची संपूर्ण टीम दुबईत जाणार आहे.

दुबईत आम्हाला आवश्यक असलेली जागा मुबलक आहे. शिवाय तिथे सोशल डिस्टन्सिग पासून इतर अनेक गोष्टी आहेत. सिनेमासाठी आम्हाला अशीच जागा हवी होती. त्यामुळे मग चित्रिकरण दुबईत हालवण्यात आलं आहे, असे दिग्दर्शक जफर म्हणाले.

कतरिना अद्याप या शुटिंगमध्ये सहभागी झाली नसली तरी ती अनेक महिन्यांपासून सुपरवुमनसाठी मेहनत करते आहे. या चित्रपटासाठी ती काही स्टंटही शिकली आहे. शिवाय तिने तिचा फिटनेसही एका सुपरवुमनला साजेसा ठेवला आहे.


बिपाशा बासूने स्वतः चा हॉट & बोल्ड फोटो केला शेअर आणि म्हणाली…