सलमान सोबतच्या नात्याबाबत कतरिनाने केला खुलासा

Mumbai
katrina with salman khan
कतरिना आणि सलमान खान बॉलिवूडची हिट जोडी

बॉलिवूड चार्म कतरिना कैफ आणि भाईजान सलमान खान या दोघांच्या नात्याबाबत सिनेसृष्टी आणि माध्यमात चवीचवीने चर्चा केल्या जातात. पार्टनर, युवराज, टायगर जिंदा है, भारत अशा अनेक चित्रपटापर्यंत दोघांनी आजवर काम केलेले आहे. दोघांमधल्या जवळीकीमुळे त्यांच्यात काहीतरी चालू असल्याचे नेहमीच बोलले जाते. मात्र याविषयी आता कतरिनानेच खुलासा केला आहे. “आमच्या दोघांमध्ये उत्तम संबंध आहेत. पण आम्ही एकमेकांना डेट करत असल्याच्या नुसत्या वावड्या उठवल्या जातात”, अशी प्रतिक्रिया कतरिनाने दिली आहे.

View this post on Instagram

☕️

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif) on

एका वृत्तवाहिनीशी बोलताना कतरिना म्हणाली की, “मागच्या १६ वर्षांपासून सलमानसोबत माझी मैत्री आहे. तो माझा खरा मित्र आहे. जेव्हा मला गरज भासली तेव्हा माझ्यासाठी तो उभा राहिला. जरी तो नेहमी संपर्कात नसला तरिही जेव्हा मला मदतीची अपेक्षा असते तेव्हा तो माझ्यासाठी धावून येतो.” कतरिना आणि रणबीर कपूर हे अनेक वर्ष नात्यात होते. मात्र रणबीरशी बिनसल्यानंतर कतरिना आणि सलमान पुन्हा जवळ आले, अशी चर्चा बॉलिवूडमध्ये रंगली होती. या चर्चेवर कतरिनाने हा खुलासा केला आहे.

नुकताच प्रदर्शित होऊन गेलेला भारत या चित्रपटात दोघांनीही धमाल केली होती. भारत ब्लॉकबस्टर सिनेमा ठरला होता. सध्या सलमान त्याच्या दंबग ३ चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये व्यस्त आहे. तर दुसऱ्याबाजुला कतरिना अक्षय कुमारसोबत सुर्यवंशी चित्रपट घेऊन येत आहे.