घरमनोरंजनVideo: ...म्हणून बिग बींनी धरले सिंधुताईंचे पाय!

Video: …म्हणून बिग बींनी धरले सिंधुताईंचे पाय!

Subscribe

आनाथांची माय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘कर्मवीर स्पेशल एपिसोड’ मध्ये सिंधुताई सहभागी होणार असल्याने प्रेक्षकांमध्ये उत्सुकता

अभिनेता अमिताभ बच्चन आणि ‘कौन बनेगा करोडपती’ या शोचे आगळे-वेगळे नातेच आहे. त्यामुळे यंदाच्या ‘कौन बनेगा करोडपती’ च्या अकराव्या पर्वात देखील अमिताभ बच्चनच या शोचे सूत्रसंचालक असल्याने चाहत्यांमध्ये नेहमीप्रमाणे उत्साह आहे. या शोमध्ये सामान्य माणसांपासून दिग्गज सेलिब्रिटींपर्यंत अनेक जण सहभागी होत असतात. यावेळी असणारा पहिला शो हा ‘कर्मवीर स्पेशल एपिसोड’ असणार आहे. त्यामुळे या शोमध्ये अनेक समाजसेवक दिसणार आहे.

- Advertisement -

सोशल मीडियावर होतोय व्हिडिओ व्हायरल

त्यामुळे, यंदा होणाऱ्या या भागात कोणती दिग्गज व्यक्ती येणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागले आहे. शुक्रवारी आनाथांची माय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिंधुताई सपकाळ या शोच्या भागात सहभागी होणार आहे. दरम्यान ‘केबीसी’ने ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ या हजेरी लावणार असल्याचा व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओमध्ये शो सुरु असताना अमिताभ बच्चन सिंधुताईंच्या पाया पडताना दिसले. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

- Advertisement -

असे आहे सिंधुताईंचे पाय पडण्याचे कारण…

बॉलिवूड विश्वात बिग बी अर्थात महानायक अमिताभ बच्चन यांचे वेगळेच स्थान, अस्तित्व आणि नावलौकीक आहे. मात्र सुप्रसिद्ध, तशी ख्याती असतानाही अमिताभ बच्चन यांनी ‘कौन बनेगा करोडपती’ सेटवर सिंधुताईंच्या पायाला स्पर्श करून त्यांचा आशीर्वाद घेतला. कारण सिंधुताई या एक सामाज सेविका असून त्याचे समाजाविषयी असणारे प्रेम आणि त्यांनी केलेले कार्य हे खूप प्रभावित करण्यासारखे आहे. त्यामुळे त्यांच्याप्रती आदर असल्याने नकळत त्यांनी सिंधुताईंचा पाय पडला.

वयवर्ष ६८ असणाऱ्या सिंधुताई यांनी आतापर्यंत १२०० पेक्षा अधिक लहान मुलांना दत्तक घेतले आहे. त्याप्रमाणेच त्यांनी अनेक मुलांचा सांभाळ देखील केली आहे. त्यामुळेच त्यांना महाराष्ट्राची मदर तेरेसा असे देखील संबोधले जाते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -