घरमनोरंजन'कौन बनेगा करोडपती'च्या ११ व्या सीजनसाठी बिग बींनी सुरु केली तयारी

‘कौन बनेगा करोडपती’च्या ११ व्या सीजनसाठी बिग बींनी सुरु केली तयारी

Subscribe

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन 'कौन बनेगा करोडपती'च्या ११ व्या सीजनमध्ये पुन्हा प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. यावेळी थोड्या वेगळ्या पद्धतीने ते सुत्रसंचालन करतील असे सांगण्यात आले आहे.

बॉलिवूडचे महानायक आणि जेष्ठ कलाकार अमिताभ बच्चन वयाच्या ७६ व्या वर्षी तितक्याच उत्साहाने काम करताना दिसतात. अमिताभ बच्चन चित्रपटांमध्ये काम करताना दिसतातच मात्र आता पून्हा अमिताभ बच्चन आपला कौन बनेगा करोडपती शो पुन्हा सुरु करणार आहेत. बिग बी सध्या ‘कौन बनेगा करोडपती’च्या ११ व्या सीजनची तयारी करत आहेत. मागीलवर्षी याच शोचे सुत्रसंचालनही अमिताभ बच्चन यांनी केले होते. आतापर्यंत अमिताभ बच्चन या शोचे सात सीजन्सचे सुत्रसंचालन केले आहे. यापुढे ११ व्या सीजनच्या सुत्रसंचालनासाठी महानायक अमिताभ बच्चन यांचे नाव समोर आले आहे. बिग बी यांनीही आपल्या ब्लॉगवरून ही माहिती दिली आहे. त्यामुळे येत्या सीजनमध्येही प्रेक्षकांना अमिताभ बच्चन यांना सुत्रसंचालन करताना बघायला मिळणार आहे.

काय म्हणाले बिग बी

“केबीसीची शुटिंग सुरु झाली आहे. या नवीन वर्षात आम्ही प्रेक्षकांना काही नव देण्याचा प्रयत्न करतो आहोत. यासाठी मी इंट्रोडक्शन, सिस्टम्स, नवीन इनपुटला शिकण्याची मी सराव करतो आहे. हे २०१९ सुरू आहे केबीसी २००० साली सुरु झाले होते.” – अमिताभ बच्चन

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -