घरमनोरंजनKBC 11 : १५०० महिना कमावणारी महिला जिंकली १ करोड रुपये!

KBC 11 : १५०० महिना कमावणारी महिला जिंकली १ करोड रुपये!

Subscribe

कौन बनेगा करोडपती या शोमध्ये एका स्वयंपाक बनवणाऱ्या महिलेने १ कोटी रुपये जिंकले आहेत!

सुपरस्टार अमिताभ बच्चन होस्ट करत असलेला शो म्हणजेच कौन बनेगा करोडपती सध्या भारतात तुफान लोकप्रिय ठरत आहे. बिग बॉस संपल्यानंतर प्रेक्षकांनी आपला मोर्चा कौन बनेगा करोडपतीकडे वळवला आहे. मात्र केबीसीचा हा अकरावा सीजन त्यात सहभाग घेणाऱ्या स्पर्धकांमुळे अधिकच चर्चेत येत आहे. नुकताच एका स्पर्धक महिलेने केबीसीत एक कोटी रुपये जिंकले. मात्र, या महिलेची कहाणी सगळ्यात चर्चेचा विषय ठरली आहे. ही महिला आंध्र प्रदेशच्या अमरावतीमधली रहिवासी आहे. या महिलेचं नाव आहे बबिता तडे!

स्वत:चा मोबाईल खरेदी करण्याचं स्वप्न!

बबिता या अमरावतीमध्ये स्वयंपाकाचं काम करतात. अमरावतीमधल्याच एका सरकारी शाळेमध्ये त्या मध्यान्ह भोजन तयार करण्याचं काम करतात. या कामाचा त्यांना महिन्याला अवघा दीड हजार रुपये मोबदला मिळतो. त्यांच्या घरची परिस्थिती कठीण आहे. त्यांचं एकमेव स्वप्न म्हणजे त्यांना स्वत:चा मोबाईल फोन घ्यायचा आहे. त्या म्हणतात, ‘मला स्वयंपाक करायला आवडतो. आणि मी जे काम करते, त्याची मला अजिबात लाज वाटत नाही.’ कौन बनेगा करोडपतीच्या ११व्या सीजनच्या १ कोटी जिंकणाऱ्या त्या दुसऱ्या स्पर्धक ठरल्या आहेत. याआधी सनोज राज नावाच्या तरुणाने एक कोटी रुपये जिंकले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -