घरमनोरंजनसैराटचे दिग्दर्शक नागराज मंजुळे करणार केबीसीचे सूत्रसंचालन

सैराटचे दिग्दर्शक नागराज मंजुळे करणार केबीसीचे सूत्रसंचालन

Subscribe

सोनी मराठी वरील कोन होईल मराठी करोडपती या रिअॅलिटी शोच्या तीसऱ्या परवाचे सुत्रसंचालन नागराज मंजुळे करताना दिसणार आहेत.

सैराट चित्रपटाने मराठी सिनेसृष्टीतील सगळे रेकॉर्डस मोडत १०० करोडचा गल्ला जमवणारे नागराच मंजुळे आता एका मराठी माणसाला करोडपती बनवताना दिसणार आहेत. सोनी मराठी वाहिनी वरील आगामी कोण होईल मराठी करोडपती या रिअॅलिटी शोच्या तिसऱ्या पर्वात ते सुत्रसंचालन करताना दिसणार आहेत. करोडपती होण्याची स्वप्न पूर्ण करणाऱ्या या शोमध्ये त्यांची एक वेगळी इनिंग लोकांना पाहायला मिळणार आहे. सैराटच्या यशाने आर्ची आणि परश्या म्हणजे आकाश ठोसर आणि रिकुं राजगुरु यांना एका रात्रीत स्टार बनवणारे नागराज मंजुळे सामान्यांचे स्टार चमकवताना दिसणार आहेत.

टिझर लॉंच

काहि दिवसांपूर्वीच कोन होईल मराठी करोडपती या कार्यक्रमाचे तिसरे पर्व येणार असल्याची घोषणा झाली होती. त्यानंतर कार्यक्रमाचा सुत्रसंचालक कोण असेल याबद्दल उत्सुकता लागून राहिली होती. अखर सोनी मराठीने आपल्या अधीकृत फेसबुक आकाऊंटवर याचा टिझर लॉंच केला आहे. ज्यात नागराज मंजुळे दिसत आहे. त्यामुळे आता या चर्चांना पूर्ण विराम मिळाला आहे. कार्यक्रमाच्या पहिल्या पर्वात सचिन खेडेकर यांनी सूत्रसंचालन केल होत, तर दुसऱ्या भागात स्वप्निल जोशी सूत्रसंचालन करताना पाहायला मिळाले होते. त्यामुळे तिसऱ्या पर्वात कोण याची चर्चा होती.

- Advertisement -

 

येत आहे कोण होणार करोडपती#KonHonaarCrorepati #SonyMarathi

Posted by Sony मराठी on Saturday, March 2, 2019

- Advertisement -

 

कितपत यशस्वी होणार ?

दिग्दर्शक म्हणून यश मिळवलेले नागराज मंजुळे सुत्रसंचालक म्हणून कितपत यशस्वी होतात हे पाहण औत्सुक्याच ठरणार आहे. सैराट मुळे लोकप्रियता मिळवल्याने नागराज मंजुळे यांचा एक वेगळा असा चाहता वर्ग आहे. तर हिंदीत गेल्या अनेक वर्षांपासून लोकप्रिय असलेल्या केबीसीचा वेगळा चाहता वर्ग आहे. तेंव्हा आता अमिताभ बच्चन प्रमाणे मंजुळेंसाठी हा कार्यक्रम बघणारा प्रेक्षकवर्ग किती असेल ? मंजुळेंच्या इंट्रीने शोला कितपत फायदा होईल हे पाहण औत्सुक्याचे ठरणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -