‘या “brand” च्या प्रेमात तेव्हापासून….’, केदार शिंदे यांनी शेअर केला राज ठाकरे यांच्याबरोबर फोटो

kedaar shinde with raj thakrey
राज ठाकरे -केदार शिंदे

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी  रोखठोक या सदरात ‘मुंबईचे खच्चीकरण कोणासाठी! जगाची नाही, मुंबई महाराष्ट्राच्या बापाची!!’  हा लेख लिहिला. या लेखात त्यांनी ठाकरे ब्रॅंडचा उल्लेख करत राज ठाकरेंना भावनिक साद घातली. त्यानंतर आता केदार शिंदे यांनी राज ठाकरे यांच्यासोबतचा फोटो पोस्ट केलेलं ट्विट व्हायरल होतं आहे.

केदार शिंदे यांनी राज ठाकरे यांच्यासोबतचा एक जुना फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत ‘या “brand” च्या प्रेमात तेव्हापासून जेव्हा photo मिळवण्याची धडपड होती.. कधी मांडीला मांडी लावून बसेन, मैत्री होईल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं!!!’ असं म्हटलं आहे. त्यांचे हे ट्विट सध्या चर्चेत आहे.

‘ठाकरे हा महाराष्ट्राच्या स्वाभिमानाच्या एक ब्रँड आहे. दुसरा महत्त्वाचा ब्रँड पवार नावाने चालतो आहे. मुंबईतून या ब्रँडनाचं नष्ट करायचं व त्यानंतर मुंबईवर ताबा मिळवायचा हे कारस्थान पुन्हा उघडे पडले आहे. राज ठाकरे हे सुद्धा त्याच ब्रँडचा एक घटक आहेत व या सगळ्याचा फटका भविष्यात त्यांनाही बसणार आहे. शिवसेनेबरोबर त्यांचे मतभेद असू शकतात, पण शेवटी महाराष्ट्रात ठाकरे ब्रँडचा जोर असायला हवा. ज्या दिवशी ठाकरे ब्रँडचं पतन होईल त्या दिवसापासून मुंबईचं पतन व्हायला सुरुवात होईल.’ असं संजय राऊत आपल्या लेखात म्हणाले होते.


हे ही वाचा – ‘सामना’मधून संजय राऊत यांची राज ठाकरेंना साद