घरमनोरंजन'केदारनाथ'च्या अडचणी वाढल्या; हाय कोर्टात याचिका दाखल!

‘केदारनाथ’च्या अडचणी वाढल्या; हाय कोर्टात याचिका दाखल!

Subscribe

'केदारनाथ' चित्रपटाविरोध आंतरराष्ट्रीय हिंदू सेना या संघटनेने गुजरात हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर पुढच्या आठवड्यात सुनावणी होण्याची शक्यता आहे.

अभिनेता सैफ अली खान आणि अमृता सिंग यांची लाडकी कन्या सारा अली खानचा पहिला-वहिला चित्रपट बऱ्याच अडचणींमधून बाहेर पडल्यानंतर आता पुन्हा नव्या अडचणीमध्ये सापडला आहे. हा चित्रपट ३० नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. परंतु, दिवसेंदिवस या चित्रपटावरील विरोध तीव्र होताना दिसत आहे. या चित्रपटाचे टीजर प्रदर्शित झाले तेव्हा केदारनाथ मंदिरातील पुजाऱ्यांनी या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली होती. केदारनाथ हा चित्रपट हिंदूची भावना दुखवणारा चित्रपट असल्याचे पुजाऱ्यांनी सांगितले होते. या चित्रपटाविरोध आंतरराष्ट्रीय हिंदू सेना या संघटनेने गुजरात हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर पुढच्या आठवड्यात सुनावणी होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा – अखेर ‘केदारनाथ’ च्या प्रदर्शनाला मुहूर्त सापडला

- Advertisement -

हिंदू संघटनेचा का आहे विरोध?

या चित्रपटामध्ये एक हिंदू मुलगा मुस्लीम तरुणीला पाठीवर वाहून नेताना दाखवले आहे. हे तांत्रिकदृष्ट्या चुकीचे आहे. कारण केदारनाथमध्ये कधीही मुस्लिम व्यक्तिला कुणी पाठीवर वाहून नेणार नाही, असे केदारनाथ मंदिराच्या पुजाऱ्यांनी सांगितले आहे. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय हिंदू सेना या संघटनेने दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे की, हा चित्रपट लव्ह जिहादला प्रोत्साहन देणारा आहे. केदारनाथ हे हिंदू धर्मियांचे पवित्र तीर्थस्थळ आहे. अशा ठिकाणी नायक-नायिकेचे चुंबन दृश्य दाखवणे गैर असून यातून हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्याचे याचिकेत म्हटले आहे.

हेही वाचा – ‘केदारनाथ’ चित्रपटाचा टीझर रिलीज!

- Advertisement -

केदारनाथला ‘या’ अडचणींचा सामना करावा लागला

सुरुवातीला निर्माता प्रेरणा अरोरा आणि दिग्दर्शक अभिषेक कपूर यांच्यातील वादामुळे या ‘केदारनाथ’चे चित्रीकरण रखडले होते. पण कालांतराने अभिषेक कपूर व निर्माता प्रेरणा अरोरा यांच्यातील मतभेद निवळला आणि ‘केदारनाथ’चा मार्ग मोकळा झाला. सुरुवातीपासूनच ‘केदारनाथ’च्या मार्गात एक ना अनेक अडचणी येत होत्या. आधी हवामानामुळे या चित्रपटाचे शूटींग रखडले होते. नंतर या चित्रपटातील लीड हिरो सुशांत सिंग राजपूत याच्या मूड स्विंगमुळे चित्रपटाचे शूटींग लांबल्याची चर्चा झाली होती. ‘केदारनाथ’मधील महाप्रलयाचा सीन मुंबईत रिक्रिएट करण्याचा निर्णय झाल्याने शूटींग लांबले होते. अखेर ‘केदारनाथ’चे शूटींगही संपले असून नुकतीच या चित्रपटाची रॅप अप पार्टी संपन्न झाली. परंतु, आता आंतरराष्ट्रीय हिंदू सेना या संघटनेच्या हाय कोर्टातील याचिकेमुळे हा चित्रपट पुन्हा अडचणीत आला आहे.


हेही वाचा – ‘केदारनाथ’ही अडकला मीम्समध्ये

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -