आपल्या कामाचे कौतुक केलेले कोणाला आवडत नाही, आपले काम उत्तम झाले की, नाही हे समजण्याकरिता कोणीही केलेले गोड कौतुक आपल्या कामाची पावतीच असते. असंच कौतुक गायिका आणि अभिनेत्री केतकी माटेगावकर हिचे झाले आहे. केतकीच्या सूरांनी सजलेला आगामी पांघरूण चित्रपटातील निळाई हे गाणं सलमान खान याने लाँच केले आहे.
बिग बॉस मराठी सीझन २ च्या भागात सलमान खानने विशेष उपस्थिती लावली होती. यावेळी हे गाणं लाँच करण्यात आलं. बिग बॉसचे होस्ट महेश मांजरेकर दिगदर्शित तसेच हितेश मोडक यांनी संगीतबद्ध केलेलं गीत केतकी माटेगावकरच्या आवाजात ऐकायला मिळते. यावेळी निळाई गाणं लाँच केल्यानंतर सलमानला केतकीचा आवाज भावला. त्याने केतकीचे भरभरून कौतुक केले. स्वत: बॉलिवूडचा भाईजान सलमान खानने केलेले कौतुक ऐकून केतकी भारावली आणि हा आपला आनंद तिने सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांसह शेअर केला आहे.
I feel blessed to be a part of a beautiful upcoming film “Pangharun” as a singer directed by Mahesh Manjrekar. A masterpiece is on its way. This beautiful song is composed amazingly talented composer @hiteshmodak. No words to express how honoured and grateful I feel when @beingsalmankhan launched our song on BIGBOSS! Sharing the special moment. Big big thanks to @maheshmanjrekar @beingsalmankhan @_nikhilsane ! And @hiteshmodak for this beautiful melody!!
Ketaki Mategaonkar ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಮಂಗಳವಾರ, ಆಗಸ್ಟ್ 13, 2019
सलमान खान आणि महेश मांजरेकर यांच्या उपस्थितीत निळाई गाण्याचे लाँचिग झाले. यावेळी ”या चित्रपटाचा गायिका म्हणून या चित्रपटाचा एक भाग आहे. यासाठी स्वतःला नशीबवान समजते. सलमान खानने केलेले कौतुक आणि हे गाणं लाँच केलं त्यावेळीच्या भावना शब्दात व्यक्त करणे कठीण आहे. मी खूप नशीबवान आहे. माझे झालेले कौतुक पाहून माझ्या भावना दाटून आल्यात. ही एक आठवण आयुष्यभर जपून ठेवावी अशीच आहे”, अशा भावना सोशल मीडियावर व्यक्त केल्या आहे.