घरमनोरंजनखिलाडी ऑन फायर; झळकणार 'या' वेब सिरीजमध्ये...

खिलाडी ऑन फायर; झळकणार ‘या’ वेब सिरीजमध्ये…

Subscribe

बॉलिवूडचा 'खिलाडी' अक्षय कुमार लवकरच वेब सिरीजमध्ये झळकणार आहे. अॅमेझॉन प्राईमच्या एका नव्या वेब सिरीजद्वारे अक्षय कुमार डिजीटल विश्वात आपली छाप उमटवण्यासाठी येत आहे.

मनोरंजन क्षेत्रात सध्या चलती आहे ती ‘डिजीटल’ प्लॅटफॉर्मची. सध्या प्रेक्षकवर्ग चित्रपट, मालिकांइतकाच किंबहुना त्याहून अधिक पसंती ‘वेब सिरीज’ना देत आहे. त्यामुळे चित्रपटसृष्टीतील अनेक नावाजलेले कलाकारही या डिजीटस प्लॅटफॉर्मकडे वळत आहेत. नवाजुद्दिन सिद्दकी, राधिका आपटे, विकी कौशल, भूमी पेडणेकर अशा अनेक स्टार्सनी वेब सिरीजमधून प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. त्यापाठोपाठ आता वेबसिरीजमध्ये झळकण्यासाठी बॉलीवूडचा आणखी एक सुपरस्टार सज्ज झाला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, बॉलिवूडचा ‘खिलाडी’ अक्षय कुमार लवकरच वेब सिरीजमध्ये झळकणार आहे. अॅमेझॉन प्राईमच्या एका नव्या वेब सिरीजद्वारे अक्षय कुमार डिजीटल विश्वात आपली छाप उमटवण्यासाठी येत आहे. ज्येष्ठ चित्रपट समीक्षक तरूण आदर्श यांनी सर्वप्रथम त्यांच्या ट्वीटर अकाउंटवरुन याविषयीची अधिकृत घोषणा केली आहे. ‘द एंड‘ असं अक्षयच्या पहिल्या-वहिल्या वेब सिरीजचं नाव असणार आहे.

- Advertisement -

अक्षय ऑन फायर

अक्षयची ही पहिली-वहिली वेबसिरीज अॅक्शन, ड्रामा आणि थ्रिलर यांची भट्टी असल्याचं समजतंय. अक्षयने स्वत:देखील ट्वीटरवरुन तसंच माध्यमांशी बोलताना याचा खुलासा केला. ”मी डिजीटल विश्वात पाऊल ठेवण्यासाठी उत्सुक आहे. याबद्दल मी सध्या फार काही सांगू शकत नाही मात्र प्रेक्षकांना ‘द एंड’ मधून खूप सारी अॅक्शन आणि थ्रिल अनुभवयाला मिळेल. ही एक काल्पनिक कथा असून पाहणाऱ्यांचं नक्कीच मनोरंजन करेल”, अशी प्रतिक्रिया अक्षयने दिली. अॅमेझॉन प्राईमनेच आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात अक्षय सहभागी झाला होता, त्यावेळी त्याने ही माहिती दिली. याशिवाय हा रॅम्पवॉक गाजला तो अक्षयच्या फायर स्टंटमुळे या शोमध्ये अक्षय ज्यावेळी रॅम्पवर उतरला त्यावेळी त्याच्या सूटला चक्क आग लावण्यात आली होती. अक्षयचा हा ‘जलवा’ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

- Advertisement -

घरी ये तुला पाहते…

दरम्यान, एकीकडे अक्षय कुमारच्या या ‘फायर’ स्टंटहून त्याचे चाहते कौतुक करत असताना दुसरीकडे त्याची पत्नी ट्विंकल खन्नाने त्याला चांगलंच खडसावलंय. अक्षयने ‘फायर सूट’ घालून रॅम्पवॉक करतानाचे फोटो ट्वीटरवरुन शेअर करताच ट्विंकलने त्यावर अक्षयला खडसावणारं ट्वीट केलं. ‘ओह शीट! अक्षय तू अशाप्रकारे फायर सेट करशील याचा मला अंदाज नव्हता. तू या स्टंटमधून सुखरुप वाचून घरी आलास तर गाठ माझ्याशी आहे…’ अशा अर्थाचं ट्वीट ट्विंकलने केलं आहे. त्यामुळे हे प्रकरण सोशल मीडियावर सध्या अधिकच चर्चिलं जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -