तो मेसेज मी पाठवला नाही – कियारा अडवाणी

तिच्या फॉलोअर्सना कोणीतरी तिच्या अकाऊंटवरुन विचित्र लिंक्स पाठवत आहे. खुद्द कियाराने याबाबतची माहिती तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे दिली आहे.

Mumbai

बॉलीवूड अभिनेते, अभिनेत्री अनेकदा ट्रोल्स आणि हॅकर्सचे शिकारी होतात. आता बॉलीवूड अभिनेत्री कियारा अडवाणी हॅकिंगची शिकारी झाली आहे. कियाराचा ट्विटर अकाउंट हॅक झाला आहे. आतापर्यंत कियाराच्या अकाऊंटवर कोणतीही विचित्र पोस्ट शेअर करण्यात आलेली नाही. पण तिच्या फॉलोअर्सना कोणीतरी तिच्या अकाऊंटवरुन विचित्र लिंक्स पाठवत आहे. खुद्द कियाराने याबाबतची माहिती तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे दिली आहे.

Kiara advanis twitter account hacked actress urges fans to ignore strange tweets

काय म्हणाली कियारा?

“माझा ट्विटर अकाऊंट हॅक झाला आहे. अकाऊंट ठीक करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. तुम्हाला जर कोणतेही विचित्र ट्विट किंवा संदेश मिळाल्यास तर कृपया त्याकडे दुर्लक्ष करा.” कियाराने पुढे लिहिले आहे की, “तुम्हाला जर माझ्या अकाऊंटवरुन कोणताही संदेश आला असेल तर कृपया त्यावर क्लिक करु नये. माझे ट्विटर अकाऊंट अद्याप हॅक आहे. आणि तो संदेश मी तुम्हाला पाठवलेला नाही.”

Kiara advanis twitter account hacked actress urges fans to ignore strange tweets 1

हे बॉलीवूडकरही हॅकर्सचे शिकारी

कियारा प्रमाणेच अनेक बॉलीवूडकरांना हॅकर्समुळे त्रासाला सामोरे जावे लागले होते. यापूर्वी अभिनेते अमिताभ बच्चन, शाहिद कपूर, महेश भट, कृति सेनन यांसह अनेक सेलेब्स सायबर गुन्ह्याचे बळी ठरले होते. दरम्यान कियारा या संकटातून किती लवकर बाहेर पडते हे महत्वाचे आहे.