घरमनोरंजनमुलांना रिअॅलिटी शोपासून दूर ठेवा - दिलीप प्रभावळकर

मुलांना रिअॅलिटी शोपासून दूर ठेवा – दिलीप प्रभावळकर

Subscribe

बालनाट्यातील अजोड कामगिरीबद्दलचा गंधार गौरव पुरस्कार यंदा दिलीप प्रभावळकर यांना जाहीर झाला आहे. त्यावेळी सत्काराला उत्तर देताना घेतलेल्या मुलाखतीत त्यांनी बालनाट्यभूमीचे आभार मानत कृतज्ञता व्यक्त केली. त्याशिवाय बाल कलाकारांना जपण्यासाठी त्यांना रिअॅलिटी शोच्या स्पर्धेपासून दूर ठेवायला हवं, असंही ते यावेळी म्हणाले.

“मी प्रौढ असलो तरी बालनाट्यामध्ये केलेल्या कामांमुळे मी एक उत्कृष्ट कलाकार झालो”, असे उदगार ज्येष्ठ नाट्यकर्मी दिलीप प्रभावळकर यांनी काढले. बालनाट्यातील अजोड कामगिरीबद्दलचा गंधार गौरव पुरस्कार यंदा दिलीप प्रभावळकर यांना जाहीर झाला आहे. त्यावेळी सत्काराला उत्तर देताना घेतलेल्या मुलाखतीत त्यांनी बालनाट्यभूमीचे आभार मानत कृतज्ञता व्यक्त केली. त्याशिवाय बाल कलाकारांना जपण्यासाठी त्यांना रिअॅलिटी शोच्या स्पर्धेपासून दूर ठेवायला हवं, असंही ते यावेळी म्हणाले. नाट्य अभिनेत्री संपदा कुलकर्णी यानी त्यांची मुलाखत घेतली. ठाण्यातील गंधार कलासंस्थेतर्फे बालरंगभूमीवरील कलाकार, नेपथ्यकार, वेशभूषाकार, प्रकाश योजना अशा विविध पुरस्कारांचा वितरण सोहळा ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे आयोजित करण्यात आला होता. व्यावसायिक बालनाट्यांसाठी अशा प्रकारचा प्रथमच पुरस्कार देण्यात येत होता.

‘रत्नाकर मतकरींच्या बालनाट्यातून बरंच शिकलो’

मुलाखतीत बोलताना दिलीप प्रभावळकर यांनी बालनाट्याचा आपल्या जीवनात मोठा वाटा असल्याचे सांगितले. याच ठिकाणी मला उत्कृष्ट अभिनयाचे धडे मिळाले. बालरंगभूमी ही एक प्रयोगशाळा आहे. येथे कलाकारांमध्ये चांगल्या अभिनयाची बीजे रोवली जातात. बालरंगभूमीवर काम करत असताना कशा प्रकारे आवाज फेकणे, संवाद बोलणे, तसेच प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याची नस या ठिकाणी सापडली. रत्नाकर मतकरींच्या बालनाट्यातून अभिनय करत असताना बरंच काही शिकलो. माझ्या आजवरच्या अभिनयातील प्रवासात बालरंगभूमीचा सर्वात मोठा वाटा असल्याचे दिलीप प्रभावळकर यांनी सांगितले.

- Advertisement -

‘व्यक्तिमत्व देखणं असणं गरजेचं नाही’

गंधार कलासंस्थेबद्दल ऐकले होते पण, आज प्रत्यक्षात पाहावयास मिळाले असे सांगून उपस्थित बालकलाकारांना सल्ला देताना ते म्हणाले की, उत्कृष्ट नट होण्यासही व्यक्तिमत्व देखणे असणे गरजेचे आहे असे नाही. तुमच्या स्वतःतील पैलू ओळखणे गरजेचे आहे. अभिनय करताना स्वत:मधील शक्ती , गुण आणि अभिनयाच्या मर्यादा पाळणे फार महत्वाचे आहे.


हेही वाचा – गांधी जयंती विशेष: चित्रपटांमधले ‘बापू’

पालकांनाही दिला महत्त्वपूर्ण सल्ला

बालकलाकारांच्या पालकांना सल्ला देताना प्रभावळकर म्हणाले की, तुमच्या आशा – आकांक्षा मुलांवर लादू नका. त्यांना उमलायला वेळ द्या. रिअॅलिटी शो सारख्या शर्यतीपासून दूर ठेवा. मी अनेक प्रकारच्या भूमिका, व्यक्तिरेखा केल्या. मानसिक संतुलन बिघडलेल्या भूमिका केल्या. पण, मी भूमिका जगत नाही तर ती फक्त मनापासून तयारी करून करत असतो. त्यामुळेच मला विविध पुरस्कार मिळाले, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -