घरमनोरंजनया कारणामुळे किम शर्मा येणार बिग बॉसच्या घरात

या कारणामुळे किम शर्मा येणार बिग बॉसच्या घरात

Subscribe

क्रिकेटर युवराज सिंग याची पूर्व गर्लफ्रेंड किम शर्मा आता बिग बॉसच्या घरात दिसणार आहे. वाइल्ड कार्डने किमचा प्रवेश बिग बॉसच्या घरात किम प्रवेश मिळवणार आहे.

प्रसिद्ध मालिका ‘बिग बॉस-१२’मध्ये बहूचर्चीत अभिनेत्री आणि मॉडेल किम शर्मा प्रेक्षकांना दिसणार आहे. किम शर्मा हीने शाहरुख खानच्या ‘मोहबते’ आणि ‘टॉम,डिक ऐंड हॉरी’ या चित्रपटांमध्ये भूमिका केली होती. मात्र आपल्या भुमिकांव्यतिरीक्त इतर कारणांमुळे किम चर्चेचा विषय बनली होती. क्रिकेटर युवराज सिंग याच्याशी प्रेमसंबध, मोलकरणीचा वाद किंवा पतीच्या मित्राच्या गाडीवर कब्जा या कारणामुळे किम चर्चेत आली. सध्या किमच्या मानधनवर चर्चा सुरु आहे मानधन ठरल्यावर किम बिग बॉसच्या घरात प्रेक्षकांना दिसेल.

या कारणामुळे दिसणार किम

बिग बॉस-१२ च्या मागील आठवड्यात ‘वीकेंड का वार’ मध्ये अभिनेत्री नेहा पेंडसेला घरातून बाहेर काढण्यात आले होते. मागील काही सिजनमध्ये वाइल्ड कार्डने अभिनेत्रींची इंट्री बिग बॉसच्या घरात होते. यावेळेस किम चे नाव समोर आले आहे. अभिनेत्री नेहा पेंडसेने मिळालेल्या मानधना इतके प्रेक्षकांचे मनोरंजन केले नाही असा दावा करण्यात आला होता. आपल्या भुमिकांऐवजी दुसऱ्या कारणांमुळे चर्चेत राहिलेली अभिनेत्री किमला बिग बॉसच्या घरात बोलावण्यात आले आहे.

- Advertisement -

किमचे किस्से

किम शर्मा ही क्रिकेटर युवराज सिंगयाची गर्लफ्रेंड असल्याच्याची चर्चा होती. मात्र तिने व्यावसायीक अली पंजाबी याच्याशी लग्न केले. मात्र हे लग्न जास्त दिवस टिकले नाही. यानंतर किमने आपल्या मोलकरणीला पगार न देता कामावरुन काढून टाकले होते. अनेक वर्षांच्या अंतरानंतर आता किम पून्हा प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -