किंग खानचा दूरदर्शनवर निवेदन करतानाचा जुना व्हिडिओ व्हायरल

हा व्हिडिओ ३० वर्षापुर्वीचा असून सोशल मीडियावर हा व्हिडिओ चांगलाच होतोय व्हायरल

Mumbai
shaharukh khan
शहारूख खान

बॉलिवूडचा किंग खान म्हणजे शहारूख खानचा पुढच्या महिन्यात वाढदिवस असल्याने वाढदिवसाच्या निमित्ताने तो आपल्या आगामी प्रोजेक्टची घोषणा करू शकतो. शहारूख खानच्या येणाऱ्या नव्या चित्रपटासाठी त्याचे चाहते नेहमी उत्सुक असतात. मागील काही दिवसांपासून शहारूख कोणत्याच चित्रपटामध्ये दिसत नसला तरी तो सोशल मीडियावर मात्र जास्तीत जास्त सक्रिय असतो. नुकताच शहारूख खानचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होताना दिसतोय.

या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये शहारूख दूरदर्शन वाहिनीवर निवेदन करताना दिसत आहे. ट्विटरवर #1MonthForSRKDay असा हॅशटॅग सूरू असून हा हॅशटॅग वापरूनच हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये शहारूख खान एका वृत्तवाहिनीच्या भूमिकेत दिसत आहे. हा व्हिडिओ ३० वर्षापुर्वीचा असून सोशल मीडियावर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत असून त्याच्या चाहत्यांमध्ये एकच चर्चा होताना दिसतेय.

शहारूख खान त्याच्या मागे प्रदर्शित झालेल्या चित्रपटांपैकी तीन चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगल्या प्रकारची कमाई करू शकला नाही. मात्र, शहारूखचा शेवटचा चित्रपट ‘झीरो’ असून या चित्रपटामध्ये त्याच्यासोबत अभिनेत्री अनुष्का शर्मासह व्यक्तिरेखा साकारली होती. या चित्रपटाच या दोघांसोबत अभिनेत्री कतरिना कैफ देखील दिसली होती.