घरमनोरंजनशाहिद सोबत किती किस झाल्या ते आठवत नाही - कियारा

शाहिद सोबत किती किस झाल्या ते आठवत नाही – कियारा

Subscribe

या किसिंग सीनची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होताना दिसतेय.

बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर आणि अभिनेत्री कियारा अडवाणी यांचा ‘कबीर सिंह’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. या ट्रेलरला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत आहे. चित्रपटाच्या प्रदर्शित होण्यापुर्वीच शाहिद आणि कियाराच्या जोडीला प्रेक्षक अधिक पसंत करत आहेत. ‘कबीर सिंह’ या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये कियारा आणि शाहिदचा एक किसिंग सीन दाखविण्यात आला आहे. या किसिंग सीनची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होताना दिसतेय.

- Advertisement -

‘कबीर सिंह’च्या ट्रेलर लॉंचच्या वेळी अभिनेत्री कियाराला अनेक प्रश्न विचारण्यात आले. या प्रश्नांमध्ये दोघांच्या किसिंग सीन बद्दल देखील काही प्रश्न विचारण्यात आले. त्यावेळी तिला दोघांत साधारण किती किसिंग सीन असतील? असा प्रश्न विचारल्यावर अनेक जण या प्रश्नावर हसले. मात्र, कियाराने या प्रश्नाला न टाळता ‘मी या किसिंग सीनमधील किस मोजले नाही, त्यासाठी तुम्हाला २१ जूनला हा चित्रपट बघावा लागेल’, असे उत्तर दिले.

- Advertisement -

ट्रेलर लॉंच दरम्यान शाहिद कपूरला चित्रपटातील त्याच्या वेगवेगळ्या लूक्स बद्दल अनेक प्रश्न विचारण्यात आले त्याचे शाहिदने मजेशीर अंदाजात उत्तरं दिले.

 

View this post on Instagram

 

One for Instagram ? styled by @lakshmilehr @makeupbylekha @bbhiral

A post shared by KIARA (@kiaraaliaadvani) on

या चित्रपटात शाहिदच्या दोन वेगवेगळ्या भूमिका प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर बघितल्यावर अधिक वेळ शाहिद नशा करताना तर कोणावर राग व्यक्त करताना दिसत आहे. ‘कबीर सिंह’ हा चित्रपट २०१७ रोजी प्रदर्शित झालेल्या तेलगू ब्लॉकबस्टर ‘अर्जुन रेड्डी’ चा हिंदी रिमेक आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -