रामाच्या भूमिकेसाठी अरूण गोविल यांनी सोडली ‘ही’ सवय!

आजही चित्रपटांमध्ये राम म्हटलं की एकच व्यक्ती डोळ्यासमोर येते ती म्हणजे रामाची उत्तम भुमिका करणारे अरूण गोविल.

Mumbai

रामजन्मभूमी आणि बाबरी मशीद वादावर सुप्रीम कोर्टाने ऐतिहासिक निर्णय जाहीर केला आहे. या निर्णयाकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलं होतं. पण आता आम्ही तुम्हाला अशा व्यक्ती विषयी सांगणार आहोत जीने चित्रपटांमध्ये रामाच्या भुमिका स्विकारल्या. नंतर हा चित्रपट छोट्या छोट्या भागांमध्ये मालिका स्वरूपातही दाखवल्या गेल्या. पण आजही चित्रपटांमध्ये राम म्हटलं की एकच व्यक्ती डोळ्यासमोर येते ती म्हणजे रामाची उत्तम भुमिका करणारे अरूण गोविल. रामायण या मालिकेतील जेवढी पात्र होती ती पात्र आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत.

आजपर्यंत जितक्या लोकांनी रामायण वाचलं आहे त्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक लोकांनी रामायण ही मालिका बघितली आहे. पहिल्यांदा अरूण गोविल हेच राम म्हणून प्रेक्षकांच्या समोर आले. रामानंद सागर यांच्या रामायण या मालिकेत रामाची भुमिका साकारणं ही काही छोटी गोष्ट नव्हती. या भुमिकेसाठी अरूण गोविल यांना अनेक गोष्टींचा त्याग करावा लागला. एका मुलाखती दरम्यान अरूण गोविल म्हणाले, की ऑडीशनमध्ये रामानंद सागर यांनी त्यांना पहिल्यांदा रिजेक्ट केलं होतं. कारण रामानंद सागर यांना वाटत होते की रामाची भुमिका साकारणारी व्यक्तीला कोणती चुकीची सवय असू नये. कारण अरूण गोविल यांना सिगरेट पिण्याची सवय होती. पण ही भुमिका मिळावी यासाठी अरूण यांनी सिगरेटची सवय सोडून दिली.

ही भुमिका करताना अरूण यांनी हळूहळू सिगरेट सोडून दिली. रामाच्या भुमिकेनंतर इतनी सी बात, श्रद्धांजली, जियो तो ऐसे जियो, सावन को आने दो अशा चित्रपटांमध्ये त्याने कामं केली. पण प्रेक्षकांच्या तो कायम राम म्हणूनच लक्षात राहीला.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here