घरमनोरंजन'या' टॉप वेबसीरिजही अडकल्या होत्या वादाच्या भोवऱ्यात

‘या’ टॉप वेबसीरिजही अडकल्या होत्या वादाच्या भोवऱ्यात

Subscribe

लॉकडाऊनमध्ये चाहत्यां मनोरंजन म्हणून वेबसीरिज जणू आयुष्याचा भाग बनल्या होत्या. घराबाहेर जाऊ शकत नसल्याने मनोरंजनाचे मार्ग सापडत नव्हते. टीव्हीवरही त्याच त्याच जुन्या मालिका, चित्रपट पाहून अक्षश: वैताग आला होता. यावेळी नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राईमवरील अनेक वेबसिरिजने प्रेक्षकांचे पुरेपुर मनोरंजन केले. या लॉकडाऊनच्या काळात नेटफ्लिक्सवरील ‘सिक्रेट गेम्स’ या वेबसिरिजला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले. त्यामुळे वेबसिरिज आणि एकंदरीत ओटीटी प्लॅटफॉर्म वापर कर्त्यांच्या संख्येत वाढ झाली. वेबसिरिजच्या विषयांना कोणतेही बंधन नसल्याने निर्मात्यांना कमी खर्चात कोणत्याही विषयावर वेबसिरिजच्या माध्यमातून व्यक्त होता येते. मात्र वेबसिरिजचे हे स्वातंत्र्य अनेक राजकीय अजेंडा, देवधर्म, आणि संस्कृतींसाठी वादाचा मुद्दा ठरतोयं. याच आता ‘तांडव’ ही वेबसिरिज देखील धार्मिक भावना दुखावल्याने वादात अडकली आहे. ‘तांडव वेबसिरिड आदीही या टॉप वेबसिरिजला वादात अडकल्या होत्या. जाणून कोणत्या टॉप वेबसिरिज वादात सापडल्या होत्या

‘पाताल लोक’
बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माची १५ मे २०२० ला अॅंमेझॉन प्राईमवर रिलीज झालेली बहुचर्चित ‘पाताल लोक’ ही वेबसिरिज देखील वादाच्या भोवऱ्यात सापडली होती. या वेबसीरिजवरून शोची निर्माती अनुष्का शर्मा हीला कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली होती. या वेब सीरिजमधील संवादावरुन हा वाद निर्माण झाला होता. अनुष्का शर्माला १८ मे ला पाठवलेल्या या नोटीसमध्ये वीरेन सिंह गुरुंग यांनी या वेबसीरिजमध्ये जाती सूचक शब्दांचा वापर केला गेला असल्याचा आरोप केला होता. ज्यामुळे नेपाळी समुदायाचा अपमान झाल्याचं त्यांचं म्हणणं आहे. वीरेन यांनी सांगितलं, या वेबसीरिजच्या पहिल्या सीझनच्या दुसऱ्या एपिसोडमध्ये ३ मिनिटं आणि ४१ सेकंदांच्या चौकशी दरम्यान एक महिला पोलिस संबंधित नेपाळी भूमिका साकारलेल्या व्यक्तीला जातीवादी शिव्या देते. यावर उत्तरप्रदेशचे भाजपाचे आमदार नंदकिशोर गुर्जर यांनीही अनुष्का शर्माविरोधात तक्रार दाखल केली.

- Advertisement -

‘ट्रिपल एक्स २ ‘
प्रसिद्ध निर्माती एकता कपूरची ओटीटी प्लॅटफॉर्म ऑल्ट बालाजीवर रिलीज झालेली ‘ट्रिपल एक्स 2’ या वेबसिरिजला देखील तीव्र विरोध दर्शवण्यात आला होता. या वेबसिरिजवर अश्लीलता पसरवणे व धार्मिक भावना दुखावल्याचे आरोप ठेवण्यात आले होते. याप्रकरणी निर्मात्या एकता, दिग्दर्शक पंखुडी रॉड्रिग्ज आणि पटकथा लेखक जेसिका खुराना यांच्याविरूद्ध 6 जून २०२० रोजी एफआयआर नोंदविण्यात आला. तसेच मध्य प्रदेशमध्येही इंदूर येथील दोन रहिवाशांनी एफआयआर नोंदविला होता. त्याचप्रमाणे ‘बिग बॉस 13’चा स्पर्धक आणि सोशल मीडिया स्टार ‘हिंदुस्थानी भाऊ’ उर्फ विकास फाटक यानेही वेब सीरिजमधून भारतीय सैन्याचा अवमान केल्याप्रकरणी मुंबईतील खार पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. ‘ट्रिपल एक्स 2’ वेबसीरिजच्या वादानंतर संरक्षण मंत्रालयाने सेंट्रल बोर्ड सर्टिफिकेशन बोर्डाला पत्र लिहून आर्मी थीमवर कोणताही चित्रपट, डॉक्युमेंटरी किंवा वेबसीरिज प्रसारित करण्यापूर्वी प्रॉडक्शन हाऊसला मंत्रालयाकडून ना हरकत प्रमाणपत्र घेण्याचे आदेश दिले आहे.

‘द फॉमिली मॅन’
अॅमेझॉन प्राइमवर प्रदर्शित झालेली ‘द फॉमिली मॅन’ वेबसिरिजवरही आक्षेप घेण्यात आला होता. या वेबसिरिजमध्ये देशविरोधी घटना दाखवण्यात आल्याचे सांगत राष्ट्रीय स्वयं सेवक संघाने(RSS) यावेबसिरिजवर आक्षेप घेतला होता. मुख्य भूमिकेत असणाऱ्या प्रसिद्ध अभिनेता मनोज वाजपेयीच्या भूमिकेवर संघाने विरोध दर्शवला होता. संघाचे मुखपत्र असलेले ‘पांचजन्य’तही या वेबसिरिजमधून समाजात देशविरोधी अजेंडा पसरवला जात असल्याची टीका करण्यात आली होती. मुखपत्रातून या वेबसिरिजबद्दल अधिक खुलासा करत सांगण्यात आले की, या वेबसिरिजमधून NIA ची एका महिला अधिकारी सांगते की, स्पेशल पावर अॅक्टच्या जोरावर कश्मीरच्या नागरिकांचा आवाज दाबला जात आहे. त्यांचे फोन व इंटरनेट बंद करुया. ही लोकं आपल्या कृपेवर जगत आहेत. कोणाला स्वातंत्र्याने जगू नका देऊ हा अत्याचार नाही तर काय आहे? यासंदर्भात नवभारत टाइम्सने संघाच्या एका पदाधिकारीच्याकडून माहिती घेत ही बातमी छापली होती. ज्यात पदाधिकाऱ्यांने सांगितले की , जेव्हा जम्मू काश्मीरमध्ये अनुच्छेद ३७० रद्द करण्यात आले व काश्मीरमध्ये इतर राज्यांप्रमाणे स्वातंतत्र्य देण्यात याचदरम्यान या वेबसिरिजच्या माध्यमातून भारत विरोधी एजेंड्याला बळ देण्यात येत होते.

- Advertisement -

‘द गॉडमॅन’
‘द गॉडमॅन’ ही वेबसिरिज प्रदर्शित होण्यापूर्वीच वादात सापडली होती. या वेबसिरिज निर्मात्याविरोधात चेन्नईतील भाजपा प्रवक्त्याने एफआइआर दाखल केला होता. भाजपा प्रवक्त्याचे म्हणणे होते की, मधु वेबसिरिजने या वेबसिरिजमधून काही समुदायांविरोधात वातावरण पसरवले जात आहे. तसेच काही धर्मांच्या गोष्टींना वेगळ्या पद्धतीने दाखवण्यात आले आहे. द गॉडमॅनच्या निर्मात्यांविरोधात बीजेपी प्रवक्ते नारायण तिरुपती यांनी गुन्हा दाखल केला होता. त्यामुळे सोशल मिडियावरही या वेबसीरिजला तीव्र विरोध झाला. ‘द गॉडमॅन’वर हिंदू धर्म आणि त्यासंबधीत प्रतिकांना चुकीच्या पद्धतीने दर्शवण्यत आल्याचा आरोप ठेवण्यात आले होते.

‘अभय २’
बहुचर्चित ठरलेल्या ‘अभय २’ या वेबसिरिजला घेऊन देखील अनेक वाद समोर आले होते. इंदोर येथील क्रांतिकारी कुटुंबाशी संबंधितांकडून या वेबसिरिजला तीव्र विरोध झाला. त्याचप्रमाणे या वेबसिरिज निर्मात्यांवर कारवाई करण्याची मागणी केली जात होती. ‘अभय २’ या वेबसिरिजमध्ये दाखण्यात आलेल्या एका दृश्यामुळे वाद निर्माण झाला होता. या दृश्यात एका पोलीस ठाण्यात ज्याठिकाणी हिस्ट्रीशीटर आणि कुख्यात गुंडाचे फोटो असतात. त्याठिकाणी क्रांतिकारी खुदीराम बोस यांचा फोटो लावण्यात होता.

‘लैला’
१९४७ साली भारत स्वतंत्र झाला आणि नियतीशी करार सुरू झाला. हा करार शंभर वर्षांनंतर राजकीय परिस्थितीला अनुसरून कसा असेल याचे वर्णन करणारी “लैला’ ही वेब वेबसीरिज नुकतीच ‘नेटफ्लिक्स’वर रिलीज झाली होती. जून २०१९ मध्ये प्रदर्शित झालेली ‘लैला’ या वेबसिरिजला देखील विरोध झाला होता. दीप मेहता निर्मित या वेबसिरिला सोशल मिडियावर बरचं ट्रोल करण्यात आले. या वेबसिरिजविरोधात ट्विटरवर #hinduphobia असा ट्रेंड सुरु होता. ‘लैला’ या वेबसीरिजमध्ये हुमाकुरेशी मुख्य भूमिकेत झळकली होती. वेबसिरिजमध्ये पुढील ५० वर्षानंतरच्या भविष्याची कथा सांगण्यात आले होती. ज्यामध्ये पुढील जग हे एका खास विचारधारेने जखडले जाणार असून अराजकता माजली जाणार असल्याचे दर्शवण्यात आले होते.

‘हसमुख’
नुकतीच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेली कडक कॉमेडी वेबसिरिज ‘हसमुखला’ही विरोध झाला होता. या वेबसिरिजमध्ये वीर दास मुख्य भूमिकेत झळकले. परंतु या वेबसिरिजविरोध थेट कोर्टात गेला होता. दिल्ली उच्च न्यायालयात एका याचिकाकर्त्यांने ‘हसमुख’ वेबसिरिजचे प्रदर्शन रोखण्याची मागणी केली होती. या वेबसिरिजविरोधात याचिकाकर्त्यांनी वकीलांची प्रतिमा आणि प्रतिष्ठा धुळीला मिळवल्याचा आरोप लावला आहे. तसेच वेबसिरिजच्या चौथ्या भागात वकीलांना चोर, बदमाश, गुंड आणि बलात्कारीच्या रुपात दर्शवण्यात आले आहे. असे वकिलांचे म्हणणे होते. त्यामुळे या वेबसिरिजला तीव्र विरोध करण्यात आला.

‘सिक्रेड गेम्स सिरिज’
‘सेक्रेड गेम्स’ या नेटफ्लिक्सच्या पहिल्या ओरिजनल वेबसीरिजचे पहिले सीजन तुफान गाजले आणि 405 दिवसांच्या प्रतीक्षेनंतर या सीरिजचा दुसरा सीझन प्रदर्शित करण्यात आला. परंतु या वेबसिरिजलाही तीव्र विरोध करण्यात आला होता. दिल्लीचे भाजपा प्रवक्ते तेजिंदरपाल सिंह बग्गा यांनी अनुगार कश्यप ‘सिक्रेड गेम्स’ वेबसिरिजवर शीख समुदायाच्या भावना दुखावल्याच्या आरोप लावण्यात आले होते. तसेच अनुराग कश्यप यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता, या वेबसिरिजच्या एका दृश्यामध्ये शीख समुदायातील व्यक्तीची भूमिका निभावणाऱ्या सैफ अली खान आपला कडा फेकून देतो. परंतु हा कडा शीख समुदायाच्या पाच पवित्र गोष्टींमधील एक मानला जातो. त्यामुळे शीख समुहाकडून या वेबसीरिजला तीव्र विरोध करण्यात आला.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -