घरमनोरंजनप्रभास करतोय 'देवसेना'ला डेट?

प्रभास करतोय ‘देवसेना’ला डेट?

Subscribe

प्रभासला अनेकदा अनुष्का शेट्टी संदर्भात प्रश्न विचारले जातात. पण त्या प्रश्नांची उत्तरे देणे तो टाळतो. करणने रॅपिड फायरमध्ये प्रश्न विचारल्यानंतर सगळेच मला हा प्रश्न विचारताच ,असे म्हणत गोड हसतो

‘बाहुबली’ आणि ‘देवसेना’ हे खऱ्या आयुष्यात रिलेशनशीपमध्ये आहेत आणि लवकरच ते लग्न करणार आहेत, अशा चर्चा आतापर्यंत अनेकदा रंगल्या आहेत. पण या बद्दल स्वत: प्रभासला काय वाटते हे जाणून घेण्याचा प्रयत्न आतापर्यंत अनेकांनी केला आहे. पण करणच्या कॉफीने मात्र त्याला त्यांच्यात काय आहे ते बोलायला भाग पाडले आहे. नेमकं काय म्हणाला प्रभास ? हे तर तुम्हाला कॉफी विथ करणच्या भागात पाहायला मिळणार आहे. त्याची एक झलक स्टार वर्ल्डने नुकतीच ट्विटरवर शेअर केली आहे.

- Advertisement -

मस्तीखोर प्रभास

कॉफी विथ करणच्या या भागामध्ये बाहुबलीमधील तिकडी येणार आहे. प्रभास, राणा दुगुबत्ती, राजामौली ही तिघेजण करणसोबत कॉफीचा आस्वाद घेत घेत त्याच्या रॅपिड फायर प्रश्नांची उत्तरे देणार आहे. यात करण राणा आणि प्रभासपैकी कोण सर्वाधिक मस्ती करतो असे विचारल्यावर राणा प्रभास मस्तीखोर असल्याचे सांगतो. पण तो नेहमीच शांत असल्यामुळे त्याची मस्ती कोणीच पकडत नाही. तर मीच नेहमी सापडतो, असे म्हणत तो प्रभासची खिल्ली उडवतो.

- Advertisement -

अनुष्का प्रभासची गर्लफ्रेंड

प्रभासला अनेकदा अनुष्का शेट्टी संदर्भात प्रश्न विचारले जातात. पण त्या प्रश्नांची उत्तरे देणे तो टाळतो. करणने रॅपिड फायरमध्ये प्रश्न विचारल्यानंतर सगळेच मला हा प्रश्न विचारताच ,असे म्हणत गोड हसतो. तर रॅपिड फायरच्या शेवटी तू कोणत्या कॉफी कार्यक्रमात खोटं बोलला आहेस का? असे विचारल्यावर प्रभास हो असे म्हणत पुन्हा हसतो. त्यामुळे आता या मागे नेमकं गुपित काय ? असा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित होतो.

पाहा- प्रभासच्या ‘साहो’चे फर्स्ट पोस्टर
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -