घरमनोरंजनअँग्रीया क्रूझवर रंगली 'कोण होणार करोडपती' ची पत्रकारपरिषद

अँग्रीया क्रूझवर रंगली ‘कोण होणार करोडपती’ ची पत्रकारपरिषद

Subscribe

‘उत्तर शोधलं की जगणं बदलतं’ या टॅगलाइनसह ‘कोण होणार करोडपती’ या रिअॅलिटी शोचं नवीन पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सुप्रसिध्द रिअॅलिटी शोचे दिग्दर्शक नागराज मंजूळे सुत्रसंचालन करित आहेत. नवीन येणारा ‘कोण होणार करोडपती’ हे पर्व कसे असणार? त्याची टॅगलाईन कशी सुचली? या पर्वात काय काय वेगळं असणार ? नागराज मंजुळेंनाच का निवडलं असे अनेक प्रश्न प्रेक्षकांना पडले होते.

कोण होणार करोडपती

या सगळ्या प्रश्नांची उत्तर सोनी मराठी वाहिनीचे बिझनेस हेड अजय भाळवणकर यांनी दिली. नुकतीच अँग्रीया क्रूझवर ‘कोण होणार करोडपती’ची पत्रकारपरिषद पार पडली त्यावेळी त्यांनी या सगळ्या प्रश्नांची उत्तर दिली. या मराठी ‘कोण होणार करोडपती’मध्ये काही बदल करण्यात आले आहेत. सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे साडे तीन लाख राशी जिंकल्यानंतर स्पर्धकाला एक सल्लागार देण्यात येणार आहे. हा सल्लागार स्पर्धकाला कशाप्रकारे गुंतवणूक करायची हे सांगेल. त्याबरोबर प्रत्येक आठवड्याला एक कर्मवीर या स्पर्धेत सहभागी होणार आहे. आजपर्यंत ज्यांनी सामाजिक कार्यात आपलं नाव कमावलं आहे. अशा सगळ्या कर्मवीरांचा सहभाग यात होणार आहे.

- Advertisement -
कोण होणार करोडपती

नागराज मंजुळें यांच्या निवडीबदद्ल सोनी मराठी वाहिनीचे बिझनेस हेड अजय भाळवणकर म्हणाले, ‘नागराज ही अशी व्यक्ती आहे ज्यांनी सामान्य माणसातला हिरो शोधला. हा शोसुद्धा तसाच आहे. नागराज त्यावेळी नागपूरमध्ये एका चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र होते. आम्ही तिथे त्यांना भेटायला गेलो आणि त्यांना सूत्रसंचालनाची ऑफर दिली. मला वाटलं की ते खूप विचार करतील पण त्यांनी अवघ्या दहा-पंधरा मिनिटांत होकार दिला.’

- Advertisement -

तर या शो विषयी बोलताना नागराज मंजूळे म्हणाले, ‘मला लहानपणापासूनच या कार्यक्रमात सहभागी व्हावं असं वाटतं होतं. अमिताभ बच्चन यांच्याबरोबर आपल्याला संधी मिळाली असं कायम वाटात असे. फोनो फ्रेंड ही लाईफलाईन मला खूप आवडायची. पण या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करण्याची जवाबदारी माझ्यावर येईल असं कधी वाटलं नव्हतं. हे सगळंच माझ्यासाठी नवीन आहे. माझं पहिलं सूत्रसंचालन, ए.व्ही. प्रफुलचंद्रबरोबर गायलेलं कोण होणार करोडपतीचं टायटल ट्रॅक ही माझ्या आयुष्यातलं पहिलंच गाणं आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने पहिल्यांदाच मी छोट्या पडद्यावर दिसणार आहे. तेव्हा माझ्या आयुष्यात घडणाऱ्या या पहिल्या गोष्टींसाठी मी खूप मेहनत घेतली आहे.’ येत्या २७ मे पासून रात्री ८.३० ते ९.३० वाजता सोनी मराठीवर ‘कोण होणार करोडपती’ प्रसारित होईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -