नव्वदीच्या ‘या’ प्रसिद्ध गायकाने दिली रानू मंडलला गाण्याची ऑफर‍!

रानूच्या बॉलिवूड पदार्पणानंतर आता अनेकजण रानूसोबत काम करण्यासाठी उत्सुक

Mumbai

रानू मंडलने गायलेल्या प्रत्येक गाण्याचे सर्वच जण चाहते झाले आहेत. रेल्वे स्टेशनवर गात असलेली ही रानू आता बॉलिवूडमध्येही आपली छाप उमटवताना दिसत आहे. रेल्वे स्टेशनवर ‘एक प्यार का नगमा है…’ या गाण्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर गायक आणि संगीतकार हिमेश रेशमिया यांनी रानूला बॉलिवूडमध्ये त्यांच्याच चित्रपटात गाणं गाण्याची संधी देत मोठा ब्रेक दिला. यानंतर सोशल मीडियावर फक्त आणि फक्त रानू मंडलच्या नावाचीच चर्चा होताना दिसतेय.


हेही वाचा – Video: लतादीदींच्या सल्ल्यानंतरही गायलं त्याचं ‘हे’ गाजलेलं गाणं

हिमेश रेशमियाने रानूला पहिली संधी दिल्यानंतर त्यांच्या ‘हॅप्पी हार्डी अँड हीर’ या चित्रपटातील ‘तेरी मेरी कहानी…’ हे गाणं रानूच्या आवजात रेकॉर्ड करण्यात आलं. रानूच्या बॉलिवूड पदार्पणानंतर आता अनेकजण त्यांच्यासोबत काम करण्यासाठी उत्सुक असून तिच्या सोबत काम करण्याची इच्छा देखील व्यक्त करून दाखवली आहे. यामध्ये राखी सावंतचा एक छप्पन छुरी या गाण्याचा व्हिडिओ काही दिवसांपूर्वी रिलीज झाल्यानंतर रानू मंडलने तिच्या या गाण्याचे रिमिक्स व्हर्जन आपल्या आवाजात गावे, अशी इच्छा व्यक्त केली होती. मात्र, आता बॉलिवूडमधील ९० च्या दशकातील गायक कुमार सानू यांचाही समावेश झाला आहे.

९० च्या दशकातील प्रसिद्ध गायक कुमार सानू यांनी नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात रानू यांच्यासोबत काम करण्याची इच्छा बोलून दाखवली आहे. त्यांच्याच एका म्युझिक अल्बम लॉन्चच्या कार्यक्रमात त्यांना रानू यांच्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. यावेळी कुमार सानू यांनी रानू मंडलचे कौतुक केलं. हे कौतुक करताना ते म्हणाले, ‘जर कोणी नवा गायक या इंडस्ट्रीमध्ये येत असेल तर आम्हाला आनंदच वाटतो. रानू खूपच चांगलं काम करतील तर त्यांना चांगली ओळख मिळेल. जर मला त्याच्यासोबत काम करण्याचा संधी मिळाला तर मी नक्कीच त्यांच्यासोबत काम करेन. हिमेशने रानूला त्याच्या चित्रपटासाठी काम करण्याची संधी दिल्याचे मी ऐकलं आहे. मात्र रानूने गायलेलं गाणं अद्याप ऐकलं नाही. त्यामुळे येणाऱ्या काळात रानू मंडल यांचे काम कसे असेल याची उत्सुकता आहे ‘