सई-ललित यांची ‘कलरफुल’ लव्हस्टोरी प्रेक्षकांच्या भेटीस

‘कलरफुल’च्या निमित्ताने रंगाने भरलेली लव्हस्टोरी बघायला मिळणार असून या चित्रपटात करणची भूमिका ललित प्रभाकर तर सई ताम्हणकर मीराची भूमिका साकारत आहे.

लॉकडाऊन नंतर चित्रपटगृह आता उघडली जात असताना अनेक नवनवीन चित्रपटाची घोषणा या काळात होत आहे. प्रयोगशील आणि गुणी म्हणून ज्यांची दखल संपूर्ण चित्रपट सृष्टीने घेतली आहे असा दिग्दर्शक प्रकाश कुंटे आणि मूळची हिंदी निर्माती मानसी तसेच यंत्रा पिक्चर्सची निर्मिती असलेला रोमँटिक ‘कलरफुल’ या चित्रपटाची घोषणा नुकतीच चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित करून केली.

नवनवीन आणि साध्या विषयांवर प्रतिभावन कलाकृतीला घडवणारा दिग्दर्शक प्रकाश कुंटे ‘कलरफुल’ हा रंगानी भरलेला चित्रपट दिग्दर्शित करीत आहे. या चित्रपटाचे पोस्टर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले असून या पोस्टर मध्ये एक जोडपं रंगबेरंगी फुलांच्या संगतीने बसलेले दिसतात, हे जोडपं नेमकं कोण हा प्रश्न सगळ्यांना पडला होता. करण आणि मीरा हे त्या प्रश्नाचं उत्तर असून या दोघांची ही कथा आहे. ‘कलरफुल’च्या निमित्ताने रंगाने भरलेली लव्हस्टोरी बघायला मिळणार असुन या चित्रपटात करणची भूमिका ललित प्रभाकर तर सई ताम्हणकर मीराची भूमिका साकारत आहे.

चित्रपटाचा दिग्दर्शक प्रकाश कुंटे यांनी त्याच्या या नवीन जोडी विषयी असे सांगितले की, ‘ललित आणि सई हे दोघेही गुणी कलाकार आहेत, दोघांचं काम मी पाहिलं आणि अनुभवलं सुद्धा आहे, या सगळ्यात ‘करण मीरा’ हे दोघेच साकारू शकतील या बाबत मी ठाम होतो, सई आणि ललित या दोघांची पात्र जरी वेगळी असली तरी ती प्रेक्षकांना भावतील हा माझा विश्वास आहे.


VIDEO : ‘डार्लिंग’ तू लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला