शिवाच्या सोबतीने लष्करे कुटुंब सिध्दीला देणार गोड सरप्राईज

Lashkare family will give a sweet for siddhi in Jeev Zala Yedapisa serial
शिवाच्या सोबतीने लष्करे कुटुंब सिध्दीला देणार गोड सरप्राईज

‘जीव झाला येडापिसा’ मालिकेमध्ये बर्‍याच घटना बघायला मिळत आहे. आत्याबाईंनी शिवाशी धरलेला अबोला कायम आहे. तर मालिकेमध्ये चंपा नावाचे नवे पात्र आल्याने एक वेगळीच कलाटणी मिळणार आहे, असे दिसून येत आहे. चंपा आत्याबाईंची बहीण आहे, असे तिने सगळ्यांना सांगितले आहे. त्यांच्याबद्दलच्या अनेक गोष्टी चंपाला माहिती आहेत. शिवा चंपाला आत्याबाईंच्या घरी घेऊन येतो तेव्हा मात्र त्यांच्या तोंडचं पाणी पळतं. नक्की काय काय गुपितं हिला माहिती आहेत? हिच्या येण्याने सिद्धी–शिवाच्या आयुष्यात कोणतं नवं वादळ येणार? हे कळेलंच. पण हे सगळे घडत असतानाच शिवाच्या सोबतीने संपूर्ण कुटुंब सिद्धीला एक गोड सरप्राईज देणार आहेत.

लष्करे कुटुंबात आपल्या लाडक्या सिद्धीचा वाढदिवस थाटामाटात साजरा होणार आहे. दरम्यान शिवा चंपाला लष्करेंच्या जेव्हा घरी आणतो तेव्हा सगळ्यांनाच प्रश्न पडतो ही बाई नक्की कोण आहे? आणि तिचा आत्याबाईंशी नक्की काय संबंध आहे? पण जेव्हा सिद्धी या विषयाच्या खोलात जाते तेव्हा शिवा तिला बजावून सांगतो आत्याबाई ते बघून घेतील आपला याच्याशी काही एक संबंध नाही आहे.

पण सिद्धी आणि मंगल या दोघींच्या मनात हाच प्रश्न आहे. सिद्धी या संदर्भात जलवाशी देखील बोलते. चंपाचे अचानक रुद्रायतमध्ये येण्याचे कारण काय आहे? यामागे नक्की कोणतं गूढ आहे? हे सिध्दीला कळेल? चंपा आत्याबाईंकडून बोलता बोलता सगळं सत्य काढून घेते ज्यामध्ये तिला कळतं सरकार आत्याबाईंचा मुलगा नाहीये. अजून पुढे मालिकेमध्ये काय होईल? हे तुम्हाला आगामी नव्या एपिसोडमध्ये कळेल.