शहीद जवानांसाठी लता दीदींची मदत

Mumbai
Lata Mangeshkar

पुलवामा येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात आपले जवान शहीद झाले होते, या गोष्टीला दोन महिने झालेले आहेत. या धक्क्यातून अजूनही भारतीय नागरिक सावरलेला नाही. निषेध तर व्यक्त करतातच, परंतु शहीद झालेल्यांच्या कुटुंबियांना धीर कसा देता येईल हे पहात असताना सतर्क राहण्याच्या दृष्टीने अनेक संघटनांच्या वतीने प्रयत्न केले जात आहेत. गानकोकीळा जागतिक कीर्तीच्या गायिका लता मंगेशकर यांनीसुद्धा पुलवामात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांसाठी एक कोटी अकरा लाखांची मदत करण्याची तयारी दाखवलेली आहे. मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या नावाने दरवर्षी 24 एप्रिलला स्मृतीदिन सोहळा आयोजित केला जातो. गेली सत्त्याहत्तर वर्षे या सोहळ्याचे आयोजन केले जात आहे. विविध क्षेत्रातल्या गुणीजनांचा, संस्थांचा या निमित्ताने सन्मान करण्यात येतो. षण्मुखानंद येथे होणार्‍या या सोहळ्यात ही रक्कम शहिदांच्या कुटुंबियांना देण्यात येणार आहे. दीनानाथ स्मृती प्रतिष्ठान, हृदय आर्ट्स, सोहम प्रतिष्ठान यांनी या कार्यक्रमाच्या आयोजनात सहभाग घेतलेला आहे. या निमित्ताने स्वरांजली हा कार्यक्रम होणार असून हरिहरन, विभावरी आपटे, मधुरा दातार, रुपकुमार राठोड, राधा मंगेशकर, रिचा राठोड, शान, साधना सरगम, बप्पी लाहिरी यांचा या कार्यक्रमात सहभाग असणार आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here