भारतरत्न गायिका लता मंगेशकर यांच्यावर तब्बल २८ दिवसांचे उपचार केल्यानंतर ब्रीच कँडी रुग्णालयातून त्यांना सोडण्यात आले आहे. घरी परतल्यानंतर लता मंगशेकर यांनी ट्विटरवरुन चाहत्यांचे आभार व्यक्त केले आहेत. १२ नोव्हेंबर रोजी लता मंगेशकर यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. आपल्या ट्विटमध्ये त्या म्हणाल्या की, “नमस्कार. मागच्या २८ दिवसांपासून मी ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार घेत होते. मला न्युमोनिया झाला होता. माझी प्रकृती पुर्ण बरी झाल्यानंतरच मला घरी सोडले जावे, असे डॉक्टरांचे मत होते. आता मी पुर्णपणे बरी झालेली आहे. आई-वडीलांचा आशीर्वाद आणि चाहत्यांचे प्रेम, प्रार्थना यामुळेच मी बरी झाले. मी तुम्हा सर्वांची मनापासून आभारी आहे.”
नमस्कार.पिछले 28 दिनोंसे मैं ब्रीच कैंडी हॉस्पिटल में थी। मुझे न्यूमोनिया हुआ था.डॉक्टर चाहते थे की मैं पूरी तरह से ठीक हो जाऊँ फिर घर जाऊँ,आज मैं घर वापस आगयी हूँ. ईश्वर, माई बाबा के आशीर्वाद और आप सब के प्यार,प्रार्थनाओं से मैं अब ठीक हूँ.मैं आप सब की हृदयसे आभारी हूँ.
— Lata Mangeshkar (@mangeshkarlata) December 8, 2019
मेरे ब्रीच कैंडी के डॉक्टर सच में फ़रिश्ते हैं, यहाँ का सभी कर्मचारी वर्ग भी बहुत अच्छा है.आप सब की मैं पुनः एक बार मन से आभारी हूँ. ये प्यार और आशीर्वाद ऐसे ही बना रहे।
— Lata Mangeshkar (@mangeshkarlata) December 8, 2019
लता मंगेशकर रुग्णालयात दाखल झाल्यानंतर अफवांचे पेव फुटले होते. मात्र त्यांनी ट्विटरवरुन आपल्या प्रकृतीबाबत माहिती दिली होती. त्यानंतर सर्वांनीच त्यांच्या स्वास्थ्याबाबत काळजी व्यक्त करत त्यांची प्रकृती लवकर बरी होण्यासाठी प्रार्थना केली होती. त्यानंतर आज त्यांनी हिंदी आणि इंग्रजीमध्ये ट्विट करुन आपल्या चाहत्यांना त्या बऱ्या झाल्याचा संदेश दिला.
Namaskaar,
A special thank you, again to the team of doctors who treated me with utmost care and love.
Dr. Pratit Samdani, Dr. Ashwin Mehta, Dr. Zareer Udwadia, Dr Nishit Shah, Dr. Janardan Nimbolkar and Dr. Rajeev Sharma.— Lata Mangeshkar (@mangeshkarlata) December 8, 2019
मंगेशकर यांनी आपल्या इंग्रजी ट्विटमध्ये त्यांनी त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांचे आभार व्यक्त केले आहेत. डॉ. प्रतीत समदानी, डॉ. अश्विन मेहता, डॉ. जरीर उद्वाडिया, डॉ. निशित शाह, डॉ. जनार्दन निबोंळकर आणि डॉ. राजीव शर्मा यांचे त्यांनी विशेष आभार मानले आहेत.