घरमनोरंजन'लता मंगेशकरांनी गायिकांचे करियर उध्दवस्त केले'; नेटकरी संतापले!

‘लता मंगेशकरांनी गायिकांचे करियर उध्दवस्त केले’; नेटकरी संतापले!

Subscribe

लता मंगेशकरांच्या राणूला दिलेल्या सल्ल्यामुळे नेटकऱ्यांनी लता मंगेशकरांनाच ट्रोल केलं आहे.

सोशलमीडियावर रातोरात अनेकजण स्टार झाले आहेत. बंगालमधील स्टेशनवर ‘प्यार का नगमा है’ गाणं गाणाऱ्या राणूचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हायरल झालेल्या व्हीडीओ नंतर सगळ्यांनी राणूची तुलना थेट लता मंगेशकरबरोबर केली आहे. त्यानंतर संगीतकार हिमेश रेशमियाने राणूला आपल्या चित्रपटात गाण्याची संधी दिली. पण लता मंगेशकरांची उपमा मिळालेल्या राणूवर लता मंगेशकर नाराज असल्याचं दिसलं. याच राणूला गानकोकिळा लता मंगेशकर यांनी एक सल्ला दिला होता. माझी कॉपीकरून, नक्कल करून फार काळ यश मिळत नाही. हल्ली नवीन येणारे गायक किशोरदा, मोहम्मद रफी, आशा भोसले, मुकेश यांची गाणी म्हणतात. त्यामुळे काही काळ ही गाणी म्हणणाऱ्या गायकांना प्रसिध्दी मिळते. पण ही प्रसिध्दी फार काळ टिकत नाही. लता मंगेशकरांच्या या सल्ल्यामुळे मात्र नेटकऱ्यांनी लता मंगेशकरांनाच ट्रोल केलं आहे.

लतादिदींनी राणूला दिलेला सल्ल्याने नेटकरी खूप संतापले आहेत. त्यांनी लता मंगेशकरांना चांगलेच ट्रोल केले आहे. लता मंगेशकर यांनी एकेकाळी अनेक नव्या फिमेल सिंगरचे करियर उध्द्वस्त केले. अशात त्या या वयात कुणाला प्रोत्साहन कशा देऊ शकतात, असे एका युजारने लिहीले आहे.

- Advertisement -

तर आणि एका युजरने लता मंगेशकर यांच्याबद्दल नकारात्मक प्रतिक्रीया दिली. राणू मंडलला तुम्ही दिलेला सल्ला मला अजिबात मान्य नाही. तुम्हाला बोलताना अधिक विन्रम होण्याची गरज आहे. असे या युजरने म्हटले आहे. अश्या अनेक कमेंट युजर्सने केल्या आहेत. अद्याप यावर राणूची प्रतिक्रीया आलेली नाही.

- Advertisement -

गायक हिमेश रेशमिया एका पाठोपाठ एक गाणे रिलीज करतोय. ‘तेरी मेरी कहानी’ आणि ‘आदत’ या गाण्याची झलक दाखवल्यानंतर हिमेशने रानूच्या तिसऱ्या गाण्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. या शेअर केलेल्या नव्या गाण्यामध्ये रेनूचा अनोखा अंदाज पाहायला मिळत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -