घरताज्या घडामोडीजूनमध्ये मृत्यू पावलेल्या अभिनेत्याच्या घरी गोंडस मुलाचं आगमन; ज्युनिअर चिरंजीवीचा फोटो व्हायरल

जूनमध्ये मृत्यू पावलेल्या अभिनेत्याच्या घरी गोंडस मुलाचं आगमन; ज्युनिअर चिरंजीवीचा फोटो व्हायरल

Subscribe

कन्नड चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिवंगत अभिनेता चिरंजीवी सर्जा याच्या पत्नीने एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे. चिरंजीवी सर्जाच्या गोंडस मुलाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हायरल फोटोमध्ये नवजात बाळासोबत चिरंजीवीचा भाऊ आणि अभिनेता ध्रुव सर्जा दिसत आहे. चिरंजीवी मुलाच्या रुपाने परतला असल्याची भावना सध्या सोशल मीडियावरून चाहत्यांकडून व्यक्त केली जात आहे. या नव्या पाहुण्याचं स्वागत कुटुंबियांनी हसत हसत केले आहे.

- Advertisement -

काही महिन्यांपूर्वी अभिनेत्या चिरंजीवी सर्जा याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. ३९ वर्षी त्यांने बंगळूरु मधल्या रुग्णालयात त्याने अखेरचा श्वास घेतला. त्याला श्वासचा त्रास होऊ लागल्यामुळे त्यांना एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण उपचारादरम्यान त्याचा निधन झाले. यावेळेस चिरंजीवीची पत्नी मेघना राज सर्जा चार महिन्यांची गरोदर होती. तिने या कठीण परिस्थितीतही स्वतःला धीर दिला आणि सावरलं. दुःखाचा डोंगर असतानाही ती डगमगली नाही.

काही दिवासांपूर्वी चिरंजीवीच्या पत्नीचे राजेशाही थाटामाटात डोहाळे जेवणं पार पडले. या कार्यक्रमाचे फोटो देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. आता चिरंजीवीच्या मुलाचे फोटो व्हायरल होत आहेत. चिरंजीवीचा चुलत भाऊ सुरज याने बाळाचे फोटो शेअर केले आहेत. यात चिरंजीवीच्या फोटोच्या जवळ ज्युनिअर चिरंजीवीला फोटो काढल्याचे दिसून येत आहे.

- Advertisement -

दरम्यान ज्यूनिअर चिरंजीवी शिवाय त्याच्या चांदीच्या पाळण्याचा किंमतीची सध्या जास्त चर्चा होत आहे. त्यामुळे या चांदीच्या पाळण्याची किंमत जवळपास १० लाख रुपये असल्याचे म्हटले जात आहे. या चांदीच्या पाळण्याचा फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.


हेही वाचा – खासदार नुसरत जहाँ यांचे आणखी एक घायाळ करणारं फोटोशूट


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -