लक्ष्मी सिनेमात अक्षय कुमारपेक्षा कौतुक होतंय ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्याचं

अक्षय कुमारची ही भूमिका जरी भन्नाट असली तरी सोशल मीडियावर काहीस वेगळं चित्र पहायला मिळतं आहे.

laxmii public response people loved sharad kelkar performance over akshay kumar
लक्ष्मी सिनेमात अक्षय कुमारपेक्षा कौतुक होतंय 'या' मराठमोळ्या अभिनेत्याचं

ओटीटी प्लॅटफॉर्मवर सध्या प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा सिनेमा म्हणजे ‘लक्ष्मी’. अनेक वादनंतर लक्ष्मी हा सिनेमा ९ नोव्हेंबरला डिझ्नी हॉटस्टारवर रिलीज करण्यात आला. सिनेमात अभिनेता अक्षय कुमार हा मुख्य भूमिकेत आहे. त्याचा साडीतल्या तो थक्क करायला लावणाऱ्या लुकमुळे प्रेक्षकांना सिनेमा पाहायला भाग पाडले. सिनेमाचा हिरो जरी अक्षय कुमार असला तरी कौतुक मात्र मराठमोळ्या अभिनेत्याचं होत आहे.

लक्ष्मी हा ‘कंचना’ या तमिळ सिनेमाचा रिमेक आहे. कंचना या सिनेमाचा ऑफिशियल रिमेक अक्षय कुमारने केला आहे. सिनेमात अक्षयने एका मुस्लिम तरूणाची भूमिका साकारली आहे. ज्याच्या अंगात एका किन्नरचे भुत येते. अक्षय कुमारची ही भूमिका जरी भन्नाट असली तरी सोशल मीडियावर काहीस वेगळं चित्र पहायला मिळतं आहे. सिनेमात अचानक मराठमोळा अभिनेता शरद केळकरची एंट्री दाखवली आहे. अक्षय कुमारपेक्षा शरद केळकरची भूमिका जबरदस्त असल्याच्या प्रतिक्रीया सोशल मीडियावर येत आहेत. त्यामुळे सगळीकडे अक्षयपेक्षा मराठमोळ्या शरद केळकरचं कौतुक होताना दिसत आहे.

अभिनेता शरद केळकरने लक्ष्मी सिनेमात केवळ १५ मिनिटांची भूमिका साकारली आहे. स्क्रिनवर जरी तो काही मिनिटांसाठी असला तरी त्याच्या अभिनयाने तो सिनेमा संपेपर्यत प्रेक्षकांच्या मनात घर करतो. शरदने या भूमिकेला पुरेपूर न्याय दिला आहे. तान्हाजी सिनेमातील शिवाजी महाराजांची भूमिका आणि लक्ष्मी सिनेमातील लुकची बद्दल शरदच्या चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा आहे. अक्षय कुमार जर सिनेमाचं ह्रदय असला तर शरद केळकर सिनेमाचा आत्मा आहे, असं चाहते म्हणतं आहेत.

लक्ष्मी सिनेमा विषयी लोकांच्या संमिश्र प्रतिक्रीया आल्या असल्या तरी मराठमोळ्या शरद केळकरचं प्रेक्षक कौतुक करत आहेत. केवळ १५ मिनिटांच्या भूमिकेतून शरदने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. ‘तान्हाजी’ या सिनेमात अभिनेता शरदने केळकरनं छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली होती. ‘लयं भारी’ या मराठी सिनेमातून अभिनेता शरद केळकर मुख्य खलनायकाच्या भूमिकेत दिसला होता. लयं भारी सिनेमातील संग्रामची भुमिकाही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. लक्ष्मी या सिनेमानंतर अभिनेता शरद केळकरनं त्याच्या अभिनयात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे.


हेही वाचा – लवकरच रानू मंडलचं नवं गाणं ऐकायला मिळणार