घरमनोरंजनकरीना म्हणते 'तैमूरला नॉर्मल आयुष्य जगू द्या'!

करीना म्हणते ‘तैमूरला नॉर्मल आयुष्य जगू द्या’!

Subscribe

बॉलिवुडची बेबो करीना कपूर सध्या तिचं मदरहूड एन्जॉय करतेय. अवघ्या १७ महिन्यांच्या तैमूरच्या बाललिलांमुळे मम्मी करीना कपूर त्याच्यासोबतच जास्तीत जास्त वेळ घालवणं पसंत करते आहे. मात्र, असं असलं, तरी करीन कपूर तैमूरच्या बालपणाविषयी खूपच जागृत आहे. बॉलिवुडच्या ग्लॅमरपासून तैमूरला शक्य तितकं दूर ठेवण्याचा प्रयत्न करीना करत आहे.

काय म्हणाली मम्मी करीना?
कायमच फिटनेस आणि आपल्या हटके स्टाईलमुळे चर्चेत असणारी करीना कपूर बिनधास्त आणि स्पष्टपणे आपली मतं माडण्यासाठी देखील तितकीच चर्चेत असते. नुकतंच तिनं तैमूरसाठी केलेलं एक विधान चर्चेत आलं आहे. बॉलिवुडच्या ज्या ग्लॅमरस विश्वात चिमुकल्या तैमुरचे मम्मी-पप्पा अर्थात करीना कपूर आणि सैफ अली खान जगत आहेत, त्यापासून तैमूरला दूर ठेवण्याबाबत करीनाने हे विधान केलं आहे.

- Advertisement -

‘तैमूरवर डॉक्युमेंटरी बनवायची नाहीये’
करीना म्हणते, “मला तैमूरच्या आयुष्याची डॉक्युमेंटरी बनवायची नाहीये. तो अजून लहान आहे. त्यामुळे प्रत्येक वेळी त्याचे फोटो क्लिक करून घेण्यात मला रस नाही. एक – दोन वेळा ठीक आहे. त्याने फक्त एक नॉर्मल आयुष्य जगावं अशी आमच्या दोघांची (करीना-सैफ) इच्छा आहे”.

१७ महिन्यांच्या तैमूरचे १०० फॅन पेजेस!
सैफिनाचा लाडका तैमूर सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे माध्यमात चर्चेत असतो. त्याचे आताच म्हणजे तो १७ महिन्यांचा असतानाच सोशल मीडियावर १०० पेक्षा जास्त फॅन पेजेस झाले आहेत. आणि हीच गोष्ट मम्मी करीनाला चिंतेची वाटते आहे!
तैमुरच्या जन्मानंतर दोन वर्षांच्या ब्रेकनंतर करीनाचा ‘वीरे दी वेड‍िंग’ हा चित्रपट १ जूनला प्रदर्शित होणार आहे.

- Advertisement -

‘चित्रपटासाठी वेगळ्या विषयांना करीनाची पसंती
लग्नानतंर कमी चित्रपट स्वीकारते आहे का? असे विचारले असता, मी वेगळ्या विषयांवरचेच चित्रपट निवडते असं करीना म्हणाली. ‘की अॅण्ड का’, ‘उडता पंजाब’, ‘वीरे दी वेड‍िंग’ यासारखे वेगळे विषय असलेले चित्रपट मी गेल्या काळात निवडले. शिवाय सध्या मी एका वेळी एकाच चित्रपटाच्या शूटींगमध्ये काम करता येईल असे चित्रपट निवडत असल्याचंही तिनं नमूद केलं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -