घरमनोरंजनवरूण धवन पडला प्रेमात

वरूण धवन पडला प्रेमात

Subscribe

वरूण धवनच्या आयुष्यात एक सुंदर परी आली आहे, जिला पाहताच वरूण प्रेमात पडला आहे. जास्त विचार नका करू. वरूण काका बनला आहे.

वरुण धवन सध्या आपल्या चित्रपटांच्या चित्रीकरणामध्ये व्यस्त आहे. मात्र, या सगळ्यात त्याच्या आयुष्यात एक सुंदर परी आली आहे, जिला पाहताच वरूण प्रेमात पडला आहे. जास्त विचार नका करू. वरूण काका बनला असून हा आनंद त्यानं आपल्या इन्स्टावरून चाहत्यांसाठी फोटो पोस्ट केला आहे. वरूणचा मोठा भाऊ दिग्दर्शक रोहित धवन बाबा झाला आहे. इतकंच नाही तर संपूर्ण धवन परिवारनं या आनंदाचं स्वागत एका वेगळ्या अंदाजात केलं आहे.

♥️ love at first sight

A post shared by Varun Dhawan (@varundvn) on

- Advertisement -

वेगळ्या अंदाजात बाळाचं स्वागत

डेव्हिड धवन आपल्या ‘नं .१’ चित्रपटांच्या शीर्षकासाठी प्रसिद्ध आहेत. त्याचाच संदर्भ घेत संपूर्ण परिवारानं एकाच प्रकारचे टीशर्ट घालून बाळाचं स्वागत केलं आहे. वरूण स्वतः, त्याचा भाऊ रोहित, त्याची वहिनी जान्हवी देसाई, आई लाली धवन आणि वडील डेव्हिड धवन यांनी पांढऱ्या कलर्सच्या टी-शर्टवर आपापल्या नात्याप्रमाणे लिहिलं आहे. यामध्ये डॅडी नं. १, मॉम नं. १, दादी नं. १, दादू नं. १ आणि चाचू नं. १ असं टी-शर्टवर लिहिण्यात आलं आहे. सर्वांच्या चेहऱ्यावरचा बाळ आल्यानंतरचा आनंद फोटोमध्ये दिसत आहे. काही महिन्यांपूर्वीच वरूणनं वहिनी जान्हवी देसाईच्या बेबी शॉवरचे फोटोदेखील पोस्ट केले होते. सध्या वरूण आपल्या ‘कलंक’ चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत आलिया भट्ट पुन्हा एकदा दिसणार आहे. तर लवकरच त्याचा अनुष्का शर्माबरोबरचा ‘सुई – धागा’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईल. तर नुकत्याच आलेल्या ‘नवाबजादे’ चित्रपटातील ‘हाय रेटेड गबरू’मध्ये वरूणनं पुन्हा एकदा प्रेक्षकांवर आपल्या नृत्याची जादू चालवली आहे. यामध्ये त्याच्याबरोबर धर्मेश येलांडे, राघव जुयाल आणि पुनीत पाठक आणि श्रद्धा कपूर दिसले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -