Tuesday, January 12, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन लकी अली गाजवताहेत सोशल मिडिया

लकी अली गाजवताहेत सोशल मिडिया

लकी अली यांच्या व्हिडिओंना मिळतायंत लाखोंचे व्हूज

Related Story

- Advertisement -

बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध गायक म्हणून ओळख असलेले लकी अली पुन्हा एकदा चाहत्यांना मंत्रमुग्ध करण्यासाठी सज्ज झाले आहेत. कॉमेडीचे बादशाह मेहमूद यांचा मुलगा असलेले लकी अली बॉलिवूडमधून दिसेनासेच झाले होते. लकी एक उत्तम गायक आणि अभिनेतेही आहेत. आपल्या उत्कृष्ट गायनाने आत्तापर्यंत अनेक रसिकांची मने जिंकली. त्यातचं गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या गाण्यांचे व्हिडिओ सोशल मिडिया गाजवतं आहेत. लकी अली यांचा ‘ओ सनम’ हे गाणं गातानाचा व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. सोशल मिडियावर चाहत्यांकडून हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात असून एक लाख ७७ हजारांहून अधिक लोकांना हा व्हिडिओ पाहिला आहे. आमिर अलीने 9 जानेवारीला हा व्हिडीओ शेअर केला. ‘माझे आॅल टाईम फेवरेट लकी अली. अलीकडे लकी अलीची भेट झाली. नि:शब्द झालो. फक्त पाहा आणि या सुंदर गाण्याचा आस्वाद घ्या,’ असे हा व्हिडीओ शेअर करताना आमिर अलीने लिहिले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Aamir Ali (@aamirali)

- Advertisement -

दरम्यान, काही दिवसांपूर्वी देखील लकी अली यांचा गोव्याचा समुद्र किनाऱ्यावर अनेक तरुण-तरुणींच्या खोळक्यात गिटार घेऊन ‘ओ सनम…’ ‘जाए तो…’ या गाण्याचा आनंद घेणारा व्हिडिओ व्हायरल झाला होता. तो व्हिडिओ देखील सोशल मिडियावर तुफान हिट ठरला. अनेकांना हा व्हिडिओ Whatsp, इंस्टाग्रामवर तुफान शेअर केला. हृतिक रोशनच्या ‘कहो ना प्यार है’ या चित्रपटातील गाण्यांनी लकी अली अधिक प्रकाश झोतात आले. गायक म्हणून त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरूवात ‘दुश्मन दुनिया का’ या चित्रपटातील ‘नशा नशा’ या गाण्यानं केली. त्यावेळी ‘ए पल का जीना’ आणि ‘क्यो होता है प्यार’ ‘आ भी जा’, ‘हैरात’ आणि ‘सफरनामा’ अशी अनेक हीट गाणी त्यांनी बॉलिवूडला दिली. परंतु त्यानंतर ते गायनाच्या क्षेत्रात फारसे दिसले नाही.

- Advertisement -