घरमनोरंजन'मेड इन हेवन' वेबसिरीज लोकांमध्ये हीट

‘मेड इन हेवन’ वेबसिरीज लोकांमध्ये हीट

Subscribe

यंदा मार्चमध्ये अमेझॉन प्राइमची नवी वेबमालिका ‘मेड इन हेवन’ रिलीज झाल्यावर डिजिटल न्यूज, न्यूज प्रिंट आणि वायरल न्यूजमध्ये या मालिकेला चांगली लोकप्रियता मिळाली

स्कोर ट्रेंड्स इंडियाने नुकतीच मार्चमध्ये लोकप्रिय असलेल्या 20 वेबसीरिजची लिस्ट काढली आहे. त्यानूसार, ‘मिर्झापूर’ एक नंबर वर तर ‘सॅक्रेड गेम्स’ दूस-या स्थानावर आहे. तर मार्चमध्ये रिलीज झालेल्या वेबसिरीजमध्ये ‘मेड इन हेवन’ तिस-या स्थानावर आहे. गेल्या महिन्यात वेब दुनियेत ‘मेड इन हेवन’, ‘दि फायनल क़ॉल’, ‘फ्लिप’, ‘दिल्ली क्राइम’ आणि ‘दि शोले गर्ल’ या वेबसीरिज रिलीज झाल्या. त्यापैकी ‘मेड इन हेवन’ ला प्रेक्षकांनी पसंती दिली.

मेड इन हेवन लोकप्रिय

यंदा मार्चमध्ये अमेझॉन प्राइमची नवी वेबमालिका ‘मेड इन हेवन’ रिलीज झाल्यावर डिजिटल न्यूज, न्यूज प्रिंट आणि वायरल न्यूजमध्ये या मालिकेला चांगली लोकप्रियता मिळाली. त्यामूळेच तर 67.57 गुणांसह ही मालिका तिस-या स्थानावर आली. आणि मार्च 2019मध्ये झळकलेल्या वेबसीरिजमध्ये ती सर्वोच्च पदावर पोहोचली. यासोबतच, अर्जुन रामपाल, जावेद जाफरी आणि नीरज काबी स्टारर ‘झी-5 ओरिजिनल’च्या ‘द फाइनल कॉल’ने 42.57 गुणांसह लोकप्रियतेत सहावे स्थान पटकावले आहे. तर मार्चमध्ये रिलीज झालेल्या वेबसीरिजमध्ये ती दुस-या स्थानावर पोहोचली आहे.

- Advertisement -
Ranking of Webseries in released in march on Score Trends
मेड इन हेवन हीट

याशिवाय नेटफिक्स ओरिजिनल्सची ‘दिल्ली क्राइम’ 20.27 गुण मिळवून लोकप्रियतेच्या लिस्टमध्ये 12 व्या पदावर आहे. आणि मार्चमध्ये रिलीज झालेल्या वेबमालिकांमध्ये चौथ्या क्रमांकावर आहे.

भारताची पहिली स्टंटवूमन रेश्मा पठाणवर आधारित बायोपिक सीरिज, Zee 5 ओरिजिनलची ‘दि शोले गर्ल’ 10.41 गुणांसह14 व्या स्थानी पोहोचलीय. मार्च 2019मध्ये रिलीज झालेल्या वेबसीरिजमध्ये पाचव्या स्थानावर आहे. अमेरिकेच्या स्कोर ट्रेंड्स इंडिया या मिडिया-टेक कंपनीने लोकप्रियतेच्या निकषांवर आधारित ही लिस्ट दिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -