घरमनोरंजनविवाहबंधन ‘मेड इन हेवन’

विवाहबंधन ‘मेड इन हेवन’

Subscribe

भारतात अनेक जाती-धर्माचे लोक राहतात. जेवढ्या जाती तेवढ्या प्रथा. त्या आपल्याला पूजाअर्चेबरोबर विवाह सोहळ्यातही पहायला मिळतात. काही समाजाकडून हे परंपरेने जपले जात आहे, तर काही आधुनिक विचारसरणीची त्याला जोड देऊन आपल्याला हव्या त्या पद्धतीने विवाह करत असतात. अ‍ॅमेझॉन प्राईमने अशाच विवाह सोहळ्यांना प्राधान्य देणार्‍या ‘मेड इन हेवन’ या वेबसिरिजची निर्मिती केलेली आहे. नऊ भागांत तयार करण्यात आलेली ही मालिका पुढच्या महिन्यात दाखवण्यात येणार आहे. जवळजवळ दोनशे देशांत आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये ही मालिका दाखविण्यात येणार आहे.

झोया अख्तर, रिमा कागती यांनी या मालिकेची निर्मिती केलेली आहे. झोया ही नित्य मेहरा, अलंकृत श्रीवास्तव, प्रशांत नायक यांच्यासोबत काही भागांचे दिग्दर्शन करणार आहे. नुकताच या मालिकेचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आलेला आहे. सुरुवातीला दिल्लीमधील दोन वेडींग प्लॅनर्स तारा व करण यांच्या जीवनाची झलक यात पहायला मिळणार आहे. ‘बीग फॅट इंडियन वेडींग’ असणार्‍या विवाह सोहळ्यातील परंपरा आणि आधुनिक महत्त्वाकांक्षा यांच्यात होणारा वाद इथे प्रेक्षकांना पाहता येईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -