तैमूरवर मधूर भांडारकर काढणार चित्रपट?

तैमूरवर बॉलिवूडमधील प्रसिद्ध चित्रपट निर्माते मधुर भांडारकर हे चित्रपट काढणार असल्याची चर्चा सध्या रंगली पाहायला मिळत आहे.

Mumbai
madhur bhandarkar making a film on taimur ali kha
तैमूर

सोशल मीडियावर कायम पॉप्युलर आणि सर्वात अधिक चर्चेत असलेला स्टार किड म्हणजे तैमुर अली खान. अभिनेता सैफ अली खान आणि अभिनेत्री करीना कपूर यांचा तैमुर सोशल मीडियावर नेहमीच ट्रेडिंगमध्ये असतो. नेटीझन्सचा लाडक्या तैमुरची गेल्यावर्षी हुबेहुब त्याच्याप्रमाणे दिसणारी खेळणी बाजारात आली होती. त्यानंतर तैमुरचे बिस्कीट्सदेखील बाजारात दाखल झाले. त्यामुळे तैमुर अधिकच लोकप्रिय झाला आहे. आता या तैमूरवर बॉलिवूडमधील प्रसिद्ध चित्रपट निर्माते मधुर भांडारकर हे चित्रपट काढणार असल्याची चर्चा सध्या रंगली आहे. भांडारकर यांनी ‘तैमूर’ असे नाव चित्रपटासाठी रजिस्ट केले आहे. मात्र याबाबत भांडारकर यांना विचारले असता त्यांनी मात्र असा कोणताही चित्रपट तयार करत नसल्याचे सांगितले आहे.

काय म्हणाले मधुर भांडारकर?

‘माझ्या प्रोडक्शन हाऊसकडून नेहमी वेगवेगळी नावे रजिस्टर केली जात असतात. अवॉर्ड, बॉलिवूड वाईब्स अशी अनेक नावे या आदी देखील आम्ही रजिस्टर करून ठेवली आहे. याचा अर्थ असा नाही की आम्ही त्यावर आता चित्रपट तयार करत आहोत. सध्या मी वाळू माफियांवर आधारित ‘घालिब’ या चित्रपटावर काम करत आहे. गेल्या सात महिन्यांपासून माझा या चित्रपटावर अभ्यास सुरू आहे’, असे भांडारकर यांनी सांगितले.


वाचा – तैमूर करणार ‘या’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण?

वाचा – स्टार किड्समध्ये तैमूर पेक्षा सारा अली खान वरचढ


 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here