घरमनोरंजन'लो चली मे' च्या तालावर थिरकल्या पूजा आणि निशा

‘लो चली मे’ च्या तालावर थिरकल्या पूजा आणि निशा

Subscribe

‘हम आपके है कौन?’ हा सिनेमा पाहिला नसेल असं कोणी नसेलच बहुधा. त्यातील गाणी, डायलॉग आणि प्रेम अर्थात सगळ्यांचा लाडका दबंग या सिनेमामुळे अनेकांच्या गळ्याचे ताईत बनला. या सिनेमातलचं एक गाणं सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या सिनेमातील पूजा आणि निशा ही जोडी म्हणजेच माधुरी आणि रेणूका शहाणे चक्क पुन्हा एकदा या गाण्यावर ठेका धरताना दिसत आहेत.
‘बकेट लिस्ट’ या आगामी मराठी सिनेमामध्ये पुन्हा एकदा या दोघी स्र्किन शेअर करणार आहेत. या सेटवरचा हा व्हिडिओ असल्याचे देखील कळत आहे. हा सिनेमा येत्या २२ मे रोजी प्रदर्शित होणार आहे. दरम्यान दोघींचा हा व्हिडिओ व्हायरल होत असून अनेकांच्या पसंतीस उतरत आहे.

हम आपके… ची मोहिनी कायम
हम आपके है कौन ? हा सिनेमा ९० च्या दशकातला सुपर हिट सिनेमा आताही हा सिनेमा टिव्हीवर लागला,तर तो अनेक जण आवर्जून बघतात. सिनेमातलं मोठ कुटुंब, त्यातील प्रत्येक पात्र, त्यांच्यातील प्रेम या ‘की फॅक्टर्स’ मुळे या सिनेमाने प्रेक्षकांची मने जिंकली आणि या सिनेमाची मोहिनी कायम आहे.

- Advertisement -

गाणी सुद्धा हिट
हम आपके… ची गाणी सुद्धा तितकीच हिट ठरली. ही गाणी आजसुद्धा एव्हरग्रीन वाटतात. लग्नसमारंभात ही गाणी आवर्जून लावली जातात. यातील ‘वाह वा रामजी’, दिदी तेरा देवर दिवाना’, चॉकलेट लाईम ज्यूस’, ‘ये मोसम का जादू’ , जुते दो पैसे लो’, ‘लो चली मे’ ही त्यातली काही गाणी अगदी अजूनही अनेकांच्या ओठी आहेत. आता हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पुन्हा एकदा हे गाणं सगळ्यांच्या ओठी येणार हे मात्र नक्की

 

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -