घरताज्या घडामोडी'महाराष्ट्राज बेस्ट डान्सर' शोला उद्यापासून होणार सुरुवात

‘महाराष्ट्राज बेस्ट डान्सर’ शोला उद्यापासून होणार सुरुवात

Subscribe

सोनी मराठी वाहिनी नृत्य कलाकारांसाठी ‘महाराष्ट्राज बेस्ट डान्सर’ शो घेऊन आली आहे. महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून आपली कला सादर करायला अनेक डान्सर्स आले आहेत. ‘महाराष्ट्राज बेस्ट डान्सर’ या कार्यक्रमासाठी सोनी लिव्ह या Appवर ऑनलाईन ऑडिशन्स घेण्यात आल्या. महाराष्ट्रभरातून या स्पर्धेला उदंड प्रतिसाद मिळाला आहे. या ऑडिशन्समधून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतून डान्सचे सर्वोत्कृष्ट टॅलेंट समोर आले. त्यातले निवडक डान्सर्स पुढच्या फेरीमध्ये जाणार आहेत. मुंबई, पुणे यांबरोबरच लातूर, बीड, नाशिक, मालेगाव यांसारख्या ठिकाणांहूनही स्पर्धक आले आहेत. या कार्यक्रमातून/स्पर्धेतून सर्व नवोदित कलाकारांना संधी मिळणार आहे. या स्पर्धेचे परीक्षण लोकप्रिय डान्सर धर्मेश सर आणि अभिनेत्री पूजा सावंत करणार आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Pooja Sawant (@iampoojasawant)

नृत्यविश्वातले एक प्रख्यात नाव म्हणजे ‘धर्मेश सर’ आहे. आपल्या नृत्याने धर्मेश एका रियालिटी शोमधून लोकप्रिय झाला आणि त्यानंतर त्याने पुन्हा कधी मागे वळून पाहिले नाही. चित्रपट, डान्स शोज करतकरत आज ‘धर्मेश सर’ नृत्यक्षेत्रात यशाच्या आणि प्रसिद्धीच्या उंच शिखरावर पोहोचला आहे. तर सिनेसृष्टीतील ग्लॅमरस चेहरा म्हणजे पूजा सावंत आहे. पूजा एका रियालिटी शोमधून आपल्या नृत्याने प्रसिद्ध झाली आणि त्यानंतर तिनं पुन्हा कधी मागे वळून पाहिले नाही. मराठी आणि हिंदी चित्रपट करत पूजा यशाच्या आणि प्रसिद्धीच्या उंच शिखरावर पोहोचली आहे. आता दोघे एकत्र ‘महाराष्ट्राज बेस्ट डान्सर’ या डान्स शोमध्ये परीक्षण करताना दिसणार आहे. तर या शोचे सुत्रसंचालन अभिनेता संकर्षण कर्‍हाडे करणार आहे. उद्यापासून ‘महाराष्ट्राज बेस्ट डान्सर’ या शोला सुरुवात होणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -