घरमनोरंजन'या' मुळे पूजा करतेय तिच्या 'डॅडी'चे फोटो सार्वजनिक

‘या’ मुळे पूजा करतेय तिच्या ‘डॅडी’चे फोटो सार्वजनिक

Subscribe

निर्माता-दिग्दर्शक महेश भट्ट येत्या २० सप्टेंबर रोजी त्यांचा ७० वा वाढदिवस साजरा करत असून सध्या त्यांचे कधीही न पाहिलेले छायाचित्र त्यांनी मुलगी पूजा सोशल मीडियावर शेअर करत आहे.

बॉलीवूडचे ज्येष्ठ निर्माता-दिग्दर्शक महेश भट्ट यांच्या तरूणपणातील दुर्मिळ छायाचित्र त्यांची लाडकी लेक पूजा भट्ट सध्या सोशल मीडियावर प्रसिद्ध करत आहे. महेश भट्ट यांचा रोज एक फोटो ती तिच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर करत आहे. यामागच कारणही तिने जाहीर केल आहे. येत्या २० सप्टेंबर रोजी महेश भट्ट त्यांचा ७० वा वाढदिवस साजरा करत आहेत. या निमित्ता पूजा तिच्या लाडक्या ‘डॅडी’चे सात फोटो सोशल मीडियावर जाहीर करत आहे. हा उपक्रम तिने १३ सप्टेंबरपासून सुरू केला असून आजवर तीन फोटो पूजाने ट्विटर अकाऊंटवर शेअर केले आहेत. तर २० तारखेपर्यंत महेश यांचे सात अनसिन फोटो प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत.


महेश भट्ट यांचा वेगळा अंदाज 

सिनेसृष्टीत गेल्या तीन दशकांपासून दर्जेदार चित्रपटांची निर्मिती करणाऱ्या महेश भट्ट यांनी आपल्या दोनही मुलींना चित्रपटात काम करण्यासाठी नेहमीच प्रोत्साहन दिले आहे. मोठी मुलगी पूजा भट्ट हिने ९० च्या दशकात पदार्पण केले. तर आलिया भट्ट सध्याच्या काळातील आघाडीची नायिका ठरली आहे. पूजाने शेअर केलेल्या पहिल्या फोटोत जेमतेम ५-६ वर्षांची चिमुकली पूजा तिच्या वडिलांसोबत दिसत आहे. हे सर्व ब्लॅक अँड व्हाईट फोटो आहेत.

- Advertisement -


आपलाच जुना फोटो हातात घेतलेल्या महेश भट्ट यांचे हे दुर्मिळ छायाचित्र पूजाने त्यांच्या चाहत्यांसाठी शेअर केले आहे.

- Advertisement -

महेश यांचे शेवटचे हास्य

गंभीर विषयांवर चित्रपट बनवणारे महेश भट्ट या फोटोमध्ये मनमुरादपणे हसताना दिसत आहेत. मात्र या फोटोत ‘दि लास्ट लाफ’ असे लिहिले असून यानंतर महेश भट्ट कधी मनमोकळे हसलेच नाही का, हा प्रश्न त्यांच्या चाहत्यांना हा फोटो पाहिल्यावर पडू शकतो. महेश यांचे सातही फोटो प्रेक्षकांना २० सप्टेंबर रोजी पाहायला मिळणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -