घरमनोरंजनमहेश मांजरेकर यांच्यावर व्यक्तींला मारहाण केल्याचा आरोप, तक्रार दाखल

महेश मांजरेकर यांच्यावर व्यक्तींला मारहाण केल्याचा आरोप, तक्रार दाखल

Subscribe

या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला असून हा प्रकार शुक्रवारी रात्री पुणे-सोलापूर महामार्गावर घडला

अभिनेता आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्यावर एका व्यक्तीला मारहाण आणि शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. १५ जानेवारी रोजी घडलेल्या घटनेत, महेश मांजरेकर यांच्या गाडीला पाठीमागून धक्का बसल्यानंतर मांजरेकर यांनी आपल्याला शिविगाळ करुन चापट मारली, अशी तक्रार कैलास सातपुते या नावाच्या व्यक्तीने केली. सदर तक्रार पुणे जिल्ह्यातील यवत पोलिसांकडे दिली आहे. त्यानंतर महेश मांजरेकर यांच्यावर यवत पोलिस स्टेशनमधे अदखलपात्र गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. हा प्रकार शुक्रवारी रात्री पुणे-सोलापूर महामार्गावर घडल्याची माहिती मिळतेय.

- Advertisement -

असा घडला प्रकार

महेश मांजरेकर हे कारने सोलापूर रस्त्याने जात असताना त्यांनी कारला अचानक ब्रेक लावल्यामुळे माझी गाडी त्यांच्या गाडीला जाऊन धडकली. यामध्ये त्यांच्या गाडीचे किरकोळ नुकसान झाले आहे. या कारणावरून महेश मांजरेकर यांनी शिवीगाळ करत गालावर चापट मारली, असल्याचे कैलास सातपुते यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

- Advertisement -

गाडीला धडक बसल्यानंतर मांजरेकर खाली उतरून गाडीची पाहणी करत होते. यावेळी त्यांचा फिर्यादीसोबत वाद झाला. त्यानंतर मांजरेकर यांनी शिवीगाळ करत आपल्याला मारहाण केली असल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. पुणे जिल्ह्यातील यवत पोलीस स्टेशनमध्ये याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये महेश मांजरे एका व्यक्तीला तू दारू पिऊन गाडी चालवतोस का? असे विचारताना दिसताय.

काय म्हणाले मांजरेकर…

याप्रकरणावर बोलताना महेश मांजरेकर म्हणाले, माझ्या गाडीला त्यांच्या गाडीने धडक दिली. या गाडीतील तिघे लोकं दारू प्यायले होते. या घटनेचा जाब विचारल्यानंतर त्यांनी आरेरावी केली. मात्र मला उशीर होत होता म्हणून मी तेथून निघालो. माझ्या गाडीला त्यांच्या गाडीला धडक दिल्याने माझ्या नव्या मर्सिडजचं नुकसान झालं. दरम्यान त्यांनी असेही म्हटले की, माझ्या विरोधात तक्रार दिली तरी हकरत नाही. तर पोलिसांनी बोलवलं तर मी सहकार्य करेन असेही ते म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -