Video : ‘ही अनोळखी भेट’ गाणं ऐकून करा दिवसाची सुरूवात!

चित्रपटात गौरी इंगवले, रोहित फाळके आणि अमोल बावडेकर हे कलाकार प्रमुख भूमिकेत पहायला मिळणार आहेत.

Mumbai

दिग्दर्शक महेश मांजरेकर आणि झी स्टुडिओज् पुन्हा एक विलक्षण प्रेमकहाणी म्हणजेच ‘पांघरूण’ येत्या ३ एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येत आहेत. चित्रपटात गौरी इंगवले, रोहित फाळके आणि अमोल बावडेकर हे कलाकार प्रमुख भूमिकेत पहायला मिळणार आहेत.

नुकतंच या सिनेमातलं पहिलं गाणं प्रदर्शित झालं. ‘ही अनोखी गाठ’ असं या गाण्याचं नाव असून अवघ्या दोन दिवसांमध्ये या गाण्याला एक लाखाहून अधिक व्ह्यूज मिळाले. वैभव जोशींनी हे गाणं लिहिलं असून विजय प्रकाश यांनी स्वरबद्ध केलं आहे. तर हितेश मोडक याने त्याच्या सुरेल आवाजात हे गाणं गायलं आहे. काही दिवसांपूर्वी या सिनेमाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला होता. महेश मांजरेकरांच्या पांघरुण सिनेमाचं गाणं आणि टीझर पाहिल्यावर त्यांच्या काकस्पर्श या सिनेमाची आठवण आल्यावाचून राहत नाही.

काय आहे टीझरमध्ये

चित्रपटाच्या टीझरच्या सुरूवातीला कोकणातील एक सुंदर घर दिसत आहे. चित्रपटात एक मुलगी ग्रामाफोन समोर आनंदात नाचताना दिसत आहे. तर टीझरच्या बॅकग्राउंडला ‘ही अनोखी गाठ’ या गीताचं संगीत सुरू असतं. या टीझरमध्ये कोणताही संवाद नसला तरी चित्रीकरणातून अनेक गोष्टी व्यक्त करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.