‘पांघरूण’ सलमान खानचा पहिला मराठी चित्रपट?

Mumbai

बिग बॉस मराठी २ च्या मंचावर बॉलिवूडचा भाईजान सलमान खानने हजेरी लावली. यावेळी अनेक जुन्या चित्रपटांच्या आठवणीला उजाळा दिला. यावेळी एक खास घोषणाही महेश मांजरेकरांनी केली, ती म्हणजे त्यांचा आगामी चित्रपट ‘पांघरूणची’.

View this post on Instagram

Mere do Anamol Ratan❤️

A post shared by Medha M Manjrekar (@manjrekarmedha) on

या चित्रपटातील एका गाण्याची झलकही बघायला मिळाली. हे गाणं गायिका केतकी माटेगावकरने गायलं आहे. त्याचबरोबर या चित्रपटात महेश मांजरेकरांची मुलगी गौरी मुख्य भुमिकेत आहे. गौरी बरोबर गायिक,अभिनेता अमोल बावडेकर मुख्य भुमिकेत आहेत. चित्रपटातील गाण्यातील दृश्यांवरून चित्रपटात साधारण स्वातंत्र्यपुर्वकाळ दाखवण्यात आला आहे.

या चित्रपटात सलमान खानचा सहभाग ही असण्याची शक्यता आहे. आता सलमना या चित्रपटाची निर्मीती करणार की आणखी काही हे लवकरच समजेल. या आधी याच काळातील काकस्पर्श या महेश मांजरेकरांच्या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. त्यामुळे हा चित्रपटही प्रेक्षकांच्या पसंतीस पडेल अशी खात्री आहे. या चित्रपटाची निर्मीती व्हायाकॉम १८ करत आहे. या आधी महेश मांजरेकर आणि व्हायाकॉम १८ यांनी एकत्रीत पु.ल. देशपांडे यांच्यावर आधारीत ‘पुल व्यक्ती की वल्ली’ हा चित्रपट केला होता. आता सगळ्या प्रेक्षकांना महेश मांजरेकरांच्या आगामी चित्रपट पांघरूणची उत्सुकता आहे.