या चित्रपटात बघा महेश मांजरेकरांचं नवं रूप!

महेश मांजरेकर, गिरीश जोशी आणि सचिन खेडेकर यांनी काही वर्षांपूर्वी काकस्पर्श या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. त्यानंतर अनेक वर्षांनंतर हे तिघं पुन्हा ‘टेक केअर गुड नाईट’च्या निमित्ताने एकत्र आले आहेत. काकस्पर्श चित्रपटाच्या दरम्यानच या तिघांनी या कथेवर चित्रपट करण्याचा निर्णय घेतला होता. या चित्रपटात एका वेगळ्या भूमिकेतून महेश मांजरेकर प्रेक्षकांसमोर येणार आहेत.

mumbai
Mahesh Manjrekar
महेश मांजरेकर

३१ ऑगस्टला ‘टेक केअर गुड नाईट’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सायबर गुन्हेगारीवर भाष्य करणारा हा चित्रपट आहे. सायबर गुन्ह्यांमुळे सामाजिक आणि कौटुंबिक काय दुष्परिणाम उद्भवतात हे या चित्रपटात मांडण्यात आले आहे. या चित्रपटातून अनेक दिवसांनंतर निर्माते, दिग्दर्शक, अभिनेते महेश मांजरेकर प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. नुकतंच बिग बॉस मराठी या कार्यक्रमाचे होस्टिंग महेश मांजरेकर यांनी केलं होतं. त्यांच्या या होस्टिंगला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. त्यांची मिश्किल निवेदनाची पद्धत सगळ्यांनाच खूप आवडली.

चित्रपटाचं ‘काकस्पर्श’ कनेक्शन!

महेश मांजरेकर, गिरीश जोशी आणि सचिन खेडेकर यांनी काही वर्षांपूर्वी काकस्पर्श या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. त्यानंतर अनेक वर्षांनंतर हे तिघं पुन्हा ‘टेक केअर गुड नाईट’च्या निमित्ताने एकत्र आले आहेत. काकस्पर्श चित्रपटाच्या दरम्यानच या तिघांनी या कथेवर चित्रपट करण्याचा निर्णय घेतला होता. या चित्रपटात एका वेगळ्या भूमिकेतून महेश मांजरेकर प्रेक्षकांसमोर येणार आहेत. लेखक गिरीश जोशी यांचं या चित्रपटाच्या निमित्ताने दिग्दर्शन क्षेत्रात पदापर्ण होत आहे. या चित्रपटात सचिन खेडेकर, महेश मांजरेकर, इरावती हर्षे आणि आदिनाथ कोठारे यांच्या मुख्य भूमिका आहेत. चित्रपटाची निर्मिती हिमांशू केसरी पाटील (एस पी एंटरटेन्मेंट) आणि महेश मांजरेकर यांची आहे.

महेश मांजरेकर, गिरीश जोशी आणि सचिन खेडेकर यांनी काही वर्षांपूर्वी काकस्पर्श या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. त्यानंतर अनेक वर्षानंतर हे तिघं पुन्हा ‘टेक केअर गुड नाईट’च्या निमित्ताने एकत्र आले आहेत. काकस्पर्श चित्रपटाच्या दरम्यानच या तिघांनी या कथेवर चित्रपट करण्याचा निर्णय घेतला होता. या चित्रपटात एका वेगळ्या भुमिकेतून महेश मांजरेकर प्रेक्षकांसमोर येणार आहेत.

जगभरात लाखो लोक मोबाइल, क्रेडिट कार्ड, इंटरनेट वापरतात आणि त्यावरून व्यवहार करतात. तो त्यांच्या रोजच्या जीवनाचा भाग झालेला असतो. या सर्वांच्या बाबतीत हा धोका संभवतो. अशी कोणती नेमकी गोष्ट असते की ज्यामुळे सायबर गुन्हेगारांना या लोकांच्या आयुष्यात आणि व्यवहारात शिरकाव करण्याची संधी मिळते. या विषयावर हा चित्रपट आधारीत आहे. या चित्रपटाची कथा मी काकस्पर्श या चित्रपटादरम्यानच सचिन खेडेकर आणि महेश मांजरेकर यांना ऐकवली होती. चित्रपटाची कथा ऐकल्यानंतर लगेचच त्यांनी या साठी होकार दिला.

गिरीश जोशी, लेखक, दिग्दर्शक

‘टेक केअर गुड नाईट’ची कथा ही तुमच्या आमच्या दैनंदिन आयुष्यात घडणारी आहे. कोणत्याही तंत्रज्ञानाला सरावलेल्या मध्यमवर्गीय कुटुंबात अशा प्रकारच्या सायबरशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. त्या मांडताना हा चित्रपट त्यावरील उपाय आणि बऱ्या-वाईट गोष्टींबद्दल भाष्यही करतो. हा सामाजिक संदर्भ ध्यानात घेऊन मी या चित्रपटात काम करायचे ठरवले. मी यात साकारलेली भूमिका ही फारच आव्हानात्मक आणि मी आजपर्यंत केलेल्या भूमिकांपेक्षा वेगळी आहे. सायबर गुन्ह्यांबद्दल एक वेगळाच दृष्टिकोन हा चित्रपट आपल्याला देऊन जातो.

महेश मांजरेकर, अभिनेते