मकरंद-क्रांतीचा ‘ट्रकभर स्वप्नां’चा प्रवास

मकरंद देशपांडे आणि क्रांती रेडेकर यांचा ‘ट्रकभर स्वप्न' हा चित्रपट २४ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमात सर्वसामान्य जोडप्याच्या स्वप्नांचा प्रवास उलगडला आहे. दोन मुलं आणि पती-पत्नी अशा चौकोनी कुटुंबाची आणि त्यांच्या स्वप्नांची ही कथा आहे.

Mumbai
makarand deshpande and kranti redkar new marathi movie trakbhar swapna movie is comming on 24 august
मकरंद देशपांडे आणि क्रांती रेडकर यांचा 'ट्रकभर स्वप्न' २४ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला

‘ट्रकभर स्वप्न’ या सिनेमात मकरंद देशपांडे आणि क्रांती रेडकर हे दोन कलाकार एका वेगळ्या रूपात प्रेक्षकांना भेटणार आहेत. दिग्दर्शक प्रमोद पवार यांनी ‘ट्रकभर स्वप्न’ या सिनेमात सर्वसामान्य जोडप्याच्या स्वप्नांचा प्रवास उलगडला आहे. दोन मुलं आणि पती-पत्नी अशा चौकोनी कुटुंबाची आणि त्यांच्या स्वप्नांची ही कथा आहे. सर्वसामान्यांची स्वप्न फार मोठी नसतात. आपलं एक घर असावं, मुलं आणि पत्नीसोबत सुखाचे चार क्षण घालवावे, आठवड्याच्या एखाद्या संध्याकाळी चौपाटीवर फेरफटका मारावा आणि सुखाने जीवन जगावं ही सर्वसामान्यांचं स्वप्न. याच स्वप्नांच्या दुनियेत मकरंद आणि क्रांती रमल्याचे ‘ट्रकभर स्वप्न’ या सिनेमात पाहायला मिळणार आहे. हा सिनेमा २४ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

मकरंदची टॅक्सी ड्रायव्हरची भूमिका 

मकरंद देशपांडे म्हणजे प्रायोगिक रंगभूमीपासून थेट हिंदी सिनेसृष्टी गाजवलेला प्रयोगशील अभिनेता. अॅक्टर-डिरेक्टर अशी प्रतिमा असलेल्या मकरंदने मराठी आणि हिंदीसह तेलुगू, कन्नड, मल्याळम आदी दाक्षिणात्य प्रादेशिक भाषांमधील सिनेमांमध्येही अभिनय केला आहे. ‘कयामत से कमायत तक’पासून मकरंदचा हिंदी सिनेसृष्टीत सुरू झालेला प्रवास ‘प्रहार’, ‘सर’, ‘सत्या’, ‘फरेब’, ‘मकडी’ अशा वैविध्यपूर्ण विषयांवरील सिनेमांनी सजलेला आहे. पण ‘ट्रकभर स्वप्न’ या सिनेमातील मकरंदची भूमिका आजवरच्या व्यक्तिरेखांपेक्षा अगदी विरुध्द आहे. मकरंदने या सिनेमात सर्वसामान्य टॅक्सी ड्रायव्हरची भूमिका साकारली आहे.

क्रांती रेडकर साकारणार मकरंदच्या पत्नीची भूमिका

या सिनेमात मकरंदच्या जोडीला अभिनेत्री क्रांती रेडकर ही अभिनेत्री आहे. ‘सून असावी अशी’ या मराठी सिनेमाद्वारे सिनेसृष्टीत दाखल झालेल्या क्रांतीने ‘जत्रा’, ‘लाडी-गोडी’, ‘नो एन्ट्री’यांसारख्या सुपरहिट मराठी सिनेमांसोबतच प्रकाश झा यांच्या ‘गंगाजल’ मध्येही अभिनय केला आहे. या सिनेमात क्रांती मकरंदच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहे.

या दिग्गज कलाकारांनी रंगणार स्वप्न

‘ट्रकभर स्वप्न’ मध्ये मकरंद आणि क्रांती सोबत मुकेश ऋषी, मनोज जोशी, स्मिता तांबे, आदिती पोहनकर, विजय कदम, आशा शेलार आदी कलाकारांच्याही भूमिका आहेत.