‘पीएम नरेंद्र मोदी’वर लवकर निर्णय घ्या; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

'आधी चित्रपट बघा आणि नंतर बंदी आणायची की नाही ते ठरवा', असे आदेश सर्वोच्च न्यायालयानी 'पीएम नरेंद्र मोदी' या चित्रपटावर निवडणूक आयोगाने स्थगिती आणली असल्याने दिला आहे. यावर १९ एप्रिल पर्यंत निर्णय घेण्याचे आदेश दिला आहे.

Mumbai
Make an early decision on 'PM Narendra Modi'; Supreme Court Orders
'पीएम नरेंद्र मोदी'

बॉलिवूडमध्ये सध्या राजकारणी नेत्यांवर बायोपिक येत आहेत. यावर्षी शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर ‘ठाकरे’ हा चित्रपट आला. तसेच मनमोहन सिंग यांच्या जीवनावर ही बायोपिक आली. तर राहुल गांधी, जयललिता, ममता बॅनर्जी यांच्या आयुष्यावरही चित्रपट येणार आहेत. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आयुष्यावरही ‘पीएम नरेंद्र मोदी‘ या नावाने बायोपिक येत आहे. हा बायोपिक सर्वप्रथम ११ तारखेला म्हणजेच लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर प्रदर्शित होणार होता. मात्र, ‘पीएम नरेंद्र मोदी’ या चित्रपटाला निवडणूक आयोगाने निवडणूक होईपर्यंत बंदी घातली होती. त्यानंतर निर्मात्यांनी त्यासंबंधीत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, आता सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला या चित्रपटाबद्दल १९ एप्रिल पर्यंत निर्णय घेण्यासाठीचे आदेश दिले आहेत. या संबंधीत सर्वोच्च न्यायालयाने म्हणले की, सर्वप्रथम चित्रपट बघा आणि नंतर त्याचा विरोध करा, अशा प्रकारे निवडणूक आयोगाला आदेश देताने म्हटले आहे.

पुढील सुनावणी २२ एप्रिलला

सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला १९ एप्रिल पर्यंत आपला निर्णय घेण्यास सांगितला आहे. तर तो निर्णय एका लिफाफ्यात बंद करून जामा करणाचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच पुढील सुनावणी २२ एप्रिल रोजी केली जाणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा चित्रपट प्रदर्शित होणार होता. सर्वप्रथम ११ एप्रिलला हा चित्रपट प्रदर्शित होणार होता. मात्र, निवडणुकीच्या वेळी प्रदर्शित होणार म्हणून या चित्रपटावर निवडणूक आयोगाने स्थगिती दिली होती. हा चित्रपट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आयुष्यावर आधारित आहे. त्यामुळे निवडणुकीच्या काळात असे चित्रपट त्यांच्या साठी पोषक असतात, असे निवडणूक आयोगाने सांगितले होते.

या चित्रपटातील बद्दल

‘पीएम नरेंद्र मोदी’ या चित्रपटात अभिनेता विवेक ओबेरॉय याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भूमिका साकारली आहे. तसेच या चित्रपटाचे दिग्दर्शन ओमंग कुमार यांनी केले आहे. तसेच या चित्रपटामध्ये बरखा बिश्त जशोदाबेन तर अभिनेता मनोज जोशी यांचीहि महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here