Mirzapur सीजन ३ लवकरचं प्रेक्षकांच्या भेटीला

सीजन २ मध्ये गंभीर जखमी झालेले कालीन भैया आता तिसऱ्या सीजनमध्ये काय करणार? याची वाट प्रेक्षक पाहत आहेत.

मिर्झापूर वेबसिरीजच्या सीजन २ ला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. आता सीजन २ पाहिलेल्या प्रेक्षकांमध्ये ३ रा सीजन कधी येणार याविषयी उत्सुकता आहे. सीजन २ मध्ये गंभीर जखमी झालेले कालीन भैया आता तिसऱ्या सीजनमध्ये काय करणार? याची वाट प्रेक्षक पाहत आहेत. प्रेक्षकांच्या याच मागणीला उत्तर देताना मिर्झापूरच्या निर्मात्यांनी आता प्रसिद्ध सिरीजच्या तिसरा सिजन आणण्याचा निर्णय घेतला आहे.

प्रेक्षकांकडून या मालिकेला मिळालेलं जबरदस्त प्रेम आणि नवीन सीजन रिलीज झाल्यानंतर सोशल मीडियावरील प्रतिक्रिया पाहून आम्ही मनापासून कृतज्ञ आहोत, अशी प्रतिक्रिया निर्माते रितेश सिधवानी यांनी दिली आहे. या मालिकेच्या OTT प्लॅटफॉर्म अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओच्या नुसार, सुमारे ५०% प्रेक्षकांनी मालिका प्रदर्शित झाल्याच्या दोनच दिवसांत पाहिली होती. त्याचबरोबर ‘मिर्झापूर २’ अवघ्या ७ दिवसांत कोणत्याही ओटीटी प्लॅटफॉर्मवर सर्वाधिक पाहिली जाणारी मालिका बनली आहे.

‘मिर्झापूर’ची कथा मिर्झापूरचे डॉन आणि कालीन व्यापारी कालीन भैया ‘यांच्यावर आधारीत आहे. कालीन भैयाच्या मर्जीशिवाय मिर्झापूरमध्ये पानही हलत नाही. कालीन भैया यांचा मुलगा ‘मुन्ना भैया’ हा सगळ्या अडचणीचे मूळ आहे. मालिकेत गुड्डू पंडित देखील एक कडक भूमिका साकारत असून त्याचा धाकटा भाऊ बबलू पंडित ज्याची हत्या मुन्नाने केली असती. त्याचा बदला घेण्याच्या प्रयत्नात असतो. सीजन २ मध्ये तो मुन्नाला ठार मारून सूड उगवितो, पण पुढे काय होईल हे सीजन ३ येईल तेव्हाच कळेल.

पंकज त्रिपाठी, दिव्येंदु शर्मा, अली फजल, श्वेता त्रिपाठी शर्मा, राजेश तैलंग, विजय वर्मा, प्रियांशु पेनुली, शीबा चढा, हर्षिता गौर यांच्यासह अनेक कलाकारांनी या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका केल्या आहेत.


अभिनेता आसिफ बसरा यांची ‘जब वी मेट ते ‘होस्टेजेस’ पर्यतची कारकिर्द