वाढत्या वयातही तरुण दिसण्यासाठी मलायकाला करावा लागतो अवघड व्यायाम

हा व्हिडिओ प्रेक्षकांसोबत तिच्या चाहता वर्गाने नुसता बघितलाच नाही तर, मलायकाचे कौतुक देखील केले जात आहे.

Mumbai
मलायका - अमृताच्या वर्कआऊटचा व्हिडिओ व्हायरल

सगळ्या फिट अभिनेत्रींपैकी मलायका अरोरा सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टीव असते. मलायका तिचे वर्कआऊटचे व्हिडिओ इतरांसोबत शेअर करत असते. यावेळी तिने आपल्या बहिणीसोबत म्हणजेच अमृता सोबत वर्कआऊट करत असतानाचा व्हिडिओ इंस्टाग्रामवर चाहत्यांसोबत शेअर केला आहे. या व्हिडिओवर अनेकांनी प्रतिक्रिया देत, या व्हिडिओला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. #malaikasmondaymotivation असे हॅशटॅग लिहीत मलायकाने हा व्हिडिओ शेअर केला आहे.

 

View this post on Instagram

 

#malaikasmondaymotivation with @amuaroraofficial curtsying away into the week …. love the guest appearance @surilyg 😂 @reebokindia

A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial) on

चाहत्यांनी केले मलायकाचे कौतुक

या व्हिडिओमध्ये मलायका आणि अमृता लेग्ज एक्सर्साइज करताना दिसत आहे. शेअर केलेल्या पोस्टमधील फोटो पाहून ती करत असलेले व्यायाम अवघड असल्याचे दिसत आहे. हा व्हिडिओ प्रेक्षकांसोबत तिच्या चाहता वर्गाने नुसता बघितलाच नाही तर, मलायकाचे कौतुक देखील केले जात आहे. मलायका आपल्या आरोग्याची काळजीपुर्वक देखभाल करत असते. यापुर्वी ही मलायकाने आपले वर्कआऊट करतानाचे फोटो, व्हिडिओ शेअर केले होते. मलायकाने नुकताच तिचा एक फोटो शेअर केला आहे त्यात दोघी पण योग साधना करताना दिसत आहे.

ट्रोलर्सना मलायकाचे स्पष्ट उत्तर

मलायकाचे वय ४० वर्षाहून अधिक असून देखील ती एकदम फीट आणि तंदरूस्त असल्याने अनेक महिलांमध्ये मलायका आदर्श आहे. मलायकाच्या फॅशनसह तिचे वर्कआऊटला अनेक लोक फॉलो करतात. काही लोक मलायकाला ट्रोल करण्याचा देखील प्रयत्न करतात पण त्या ट्रोलर्सना मलायकाने स्पष्ट उत्तर देऊन सांगितले की, त्यांच्या नकारात्मक प्रतिक्रियेचा कोणताच फरक पडत नाही तर माझे जीवन मी आनंदाने जगेल, असे ती म्हणाली.