Corona : अर्जुननंतर आता मलायकाही कोरोना पॉझिटिव्ह

बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरनंतर त्याची प्रेयसी मलायका अरोरा हिचीदेखील कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मलायकाची बहीण अमृता अरोराने याला दुजोरा दिला आहे. काही तासांपूर्वी अर्जुन कपूरने त्याच्या इंस्टाग्रामवरून त्याची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याचे सांगितले होते. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार अर्जुन होम क्वॉरन्टाइन राहणार असल्याचेही स्पष्ट केले होते. अर्जुनमध्ये करोनाची कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. दरम्यान, मलायकाच्या ‘इंडियाज बेस्ट डान्सर्स’ या शोच्या सेटवर काही दिवसांपूर्वी सात जणांना करोनाची लागण झाल्याचे वृत्त आले होते.

काही दिवसांपूर्वी मलायका अरोराचा टीव्ही शो इंडियाज बेस्ट डान्सरच्या सेटवर सात लोक करोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले. यानंतर तातडीने या शोचं चित्रीकरण बंद करण्यात आले. मलायका आधीपासूनच या शोवर येण्यास घाबरत होती. पण तिची मनधरणी केल्यानंतर तिला परत शोमध्ये बोलावण्यात आले होते. याबाबत मला नुकतंच कोरोनाची लागण झाली आहे. माझ्यात कोरोनाची कोणतीही लक्षण नाहीत. मी स्वत:ला होम क्वारंटाईन करुन घेतले आहे, अशी माहिती मलायकाने दिली. मी लवकरच यातून बरी होईन, असेही ती म्हणाली.

हेही वाचा –

Sushant Sing Rajput Case: रिया चक्रवर्तीला NCB अधिकाऱ्यांनी बजावलं समन्स