Video: मलायकाने ‘या’ अभिनेत्रीवर चप्पल भिरकावण्याचा केला प्रयत्न!

Mumbai
Malaika Arora tried shoe hurled on neha dhupia in no filter interview

हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री मलायका अरोरा नेहमीच तिच्या फोटोंमुळे चर्चेत असते. अभिनेता आणि दिग्दर्शक अरबाज खानशी घटस्फोट झाल्यानंतर ती सध्या अर्जुन कपूरला डेट करत आहे. बॉलिवूडची ही नवी जोडी नेहमीच चर्चेत असते. अलिकडेच मलायकाने अभिनेत्री नेहा धुपियाच्या ‘नो फिल्टर सीझन ४’ या चॅट शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी तिने अनेक गोष्टींचा खुलासा केला. तिच्या प्रेग्नंसीच्या काळातील तिने अनेक आठवणी देखील सांगितल्या. या ‘नो फिल्टरसीझन ४’ शोमध्ये ती खूप मज्जा-मस्ती करताना दिसली. याच चॅट शोमध्ये मलायका आणि नेहाचा मस्ती करतानाचा व्हिडिओ नेहाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे.

या व्हिडिओमध्ये मलायकाची मुलाखत घेताना नेहा धुपिया दिसत आहे. यावेळी मलायका मज्जा-मस्ती करत मुलाखत देताना व्हिडिओमध्ये दिसत आहे. या दरम्यान मलायकाने चक्क पायातले चप्पल काढून नेहा मारण्याचा इशारा दिला. मात्र हे सर्व ती मस्तीमध्ये करताना दिसत आहे.

मलायकाने तिच्या करिअरची सुरुवात व्हिडिओ जॉकी म्हणून केली होती. त्यानंतर तिने अनेक मुझिक अल्बममध्ये काम केले आहे. सध्या मलायका कोणताही चित्रपटातून दिसली नाही आहे. तरी पण आपल्या चाहत्यांसाठी वर्कआऊट करतानाचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते.


हेही वाचा – ‘मी मुलीच्या प्रत्येक वाढदिवसाला तिची व्हर्जिनिटी टेस्ट करतो’